सध्या सर्वत्र पावसाचा, बदलत्या हवामानाचा वाहतूक यंत्रणेवर खूप मोठा फटका बसताना पाहायला पाहायला मिळत आहे. यामुळे संपूर्ण राज्यात सामान्य नागरिकांचे हाल होताना दिसत आहेत. मुंबई शहरात वाहतूक कोंडीसह रेल्वे यंत्रणेलाही फटका बसल्याच बरेच दिवसांपासून कानावर येत आहे. आज पुन्हा एकदा रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने सामान्य नागरिकांना खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागल्याचे पाहायला मिळाले. सकाळी कामावर जाण्याच्या वेळी या घटना घडल्याने अनेक नागरिक कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट रेल्वेतून उतरत चालत येण्याचा पर्यायी मार्ग निवडतात. (Vivek Agnihotri Angry Post)
बरेचदा यावर सामान्य नागरिक आवाज उठवतात तर काहीवेळा रोजचं प्रकरण आहे म्हणून याकडे दुर्लक्ष करतात. तर अशा सामाजिक मुद्द्यांवर, समस्यांवर अनेक कलाकार मंडळी वेळोवेळी आवाज उठवताना दिसतात. अशातच नुकत्याच रेल्वे यंत्रणेतील बिघाडानंतर आता एका दिग्दर्शकाने या प्रकरणावर आवाज उठविला आहे. सोशल मीडियावरुन याबाबतची पोस्ट शेअर करत त्यांनी भाष्य केलं आहे. हे दिग्दर्शक म्हणजे विवेक अग्निहोत्री.
Mumbaikars walking on railway tracks to reach their office due to failure of local train service.
— Vivek Ranjan Agnihotri (@vivekagnihotri) July 24, 2024
Just ask a simple question: Can you even imagine torture of citizens like this in any civilised country? pic.twitter.com/o1QM0XreM7
मुंबईची लोकल सेवा खोळंबली असताना बहुतांश प्रवाशांनी रेल्वे रुळांवरून चालत जात पुढचा प्रवास केला आणि कार्यलय गाठलं हा व्हिडीओ अनेक ठिकाणी व्हायरल होत असून याबाबत बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी संताप व्यक्त केला आहे. मुंबईकरांचे हाल पाहता विवेक यांनी राग व्यक्त करत हा व्हिडीओ शेअर केला आहे. सायन – माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान ऐन गर्दीच्या वेळेत तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे सेवा ठप्प झाली होती.
सोशल मीडियावर सध्या या असुविधेचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. “मुंबईतील लोकल सेवा ठप्प झाल्याने आज मुंबईकरांना असा रुळांवरुन पायी जात प्रवास करावा लागत आहे. माझा एक साधा प्रश्न आहे. कोणत्याही सुसंस्कृत देशात प्रवाशांचा असा छळ होऊ शकतो का?”, असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. यापूर्वीही विवेक अग्निहोत्री यांनी अतिवृष्टीनंतर अनेक रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले होते याबद्दल नाराजी व्यक्त केली होती.