सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले आहेत. दिवस कितीही त्रासदायक असले तरीही त्यातील एक गोडवा आणणारे फळ आपल्याला खायला मिळते. हे फळ म्हणजे फळांचा राजा ‘आंबा’. हे फळ खाण्यासाठी जितके चविष्ट आहे तितकेच ते आरोग्याला फायदेशीर आहे. पण आंब्याबाबत अनेक असे गैरसमज आहेत ज्यामुळे आपण आंबा खाणे टाळतो. याबद्दल अनेकदा म्हंटले जाते की जास्त आंबा खाल्ल्याने पोट खराब होईल, आंबे जास्त खाल्ले तर चेहऱ्यावर मुरुमं येतील. पण हे केवळ गैरसमज आहेत. असेच अजून काही गैरसमज आहेत त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. (mango myth)
यातील पहिला आणि मोठा गैरसमज म्हणजे, आंबा गोड असल्याने ज्यांना डायबेटीस म्हणजे रक्तात साखरेची पातळी अधिक असेल तर आंबा खाऊ शकत नाहीत. पण आंब्याचा गोडवा हा नैसर्गिक असतो तसेच त्यातील ग्लाइसेमिक इंडेक्स ५५ च्या खाली असतो त्यामुळे डायबेटिस असणारे लोक आंबा खाऊ शकतात. पण यासाठी डायबेटीस असणाऱ्यांचा आहार संतुलित असला पाहिजे. डायबेटीस असणाऱ्यांनी एका दिवसांत केवळ एक आंबा खावा.
आंबा खाण्यातील दुसरा गैरसमज म्हणजे वजन वाढते. आंब्याचा सीझन सुरु झाल्यानंतर अनेकदा बरेचजण म्हणतात की आंबा खाऊ नका अन्यथा वजन वाढेल. पण हे खरे नाही. आंबा हा फॅट फ्री असून सोडियम फ्री व कोलेस्ट्रॉल फ्रीदेखील आहे. त्यामुळे आंबा योग्य प्रमाणात खाल्ल्याने वजन वाढत नाही. हे अत्यंत आरोग्यवर्धक फळ असल्याने वजन कमी करण्यासाठी देखील खाऊ शकता. यामुळे तुमची पचनक्रियादेखील सुधारते आणि वजनही वाढत नाही.
तिसरा गैरसमज म्हणजे आंब्याची साल विषारी असते. तसं बघायला गेलं तर कोणत्याही फळाची साल विषारी नसते. उलट आंब्याच्या सालीमध्ये अनेक पोषक तत्व असतात. त्यामुळे ही साल खालली तरीही काही होणार नाही. पण जर सेंसिटीव्हिटी असेल तर मात्र समस्या येऊ शकतात.
गरोदर महिलांनी आंबा खाऊ नये. अनेकदा म्हंटले जाते की जर एखादी महिला गरोदर असेल तर आंबा खाणे धोकादायक ठरू शकते. पण हे खरे नसून गरोदर महिलेला या फळाची गरज असते. गरोदरपणात स्वतः डॉक्टर आंबा खाण्याचा सल्ला देतात. पण अधिक प्रमाणात सेवन केल्यास नुकसान होऊ शकते.
पाचवा आणि मुलीसाठी अधिक विचार करायला लावणारा गैरसमज म्हणजे चेहऱ्यावर मुरुमं येणं. आंब्यामध्ये खूप जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट खूप जास्त प्रमाणात असतात. हे सर्व शरीरात असलेले विषद्रव्य बाहेर काढतात. त्यामुळे शरीर पूर्ण डिटॉक्स होते. म्हणजेच आंबा खाल्ल्याने मुरुमं येत नाहीत. आंब्यामध्ये केरॅटिन असल्याने त्यामुळे चेहऱ्यावर तेज येते. जर कोणाला मुरुमाच्या त्रास असेल तर कमी खावा पण बंद करणे हा पर्याय नाही.
आंब्यामुळे अनेकांना त्वचेला त्रास होतो. पण हा त्रास सगळ्यांनाच होतो असे नाही. आंबा खायचा असेल आणि त्वचेच्या समस्या असतील तर डॉक्टरांच्या सलल्यानुसार आंबा खावा.
आंब्याला स्वतःला एक गोडवा असतो. हा गोडवा त्याच्या कालावधी प्रमाणे वाढतो.
अधिक पिकलेला आंबा खाल्ल्याने कोणताही त्रास होत नाही तसेच पोटालादेखील कोणत्याही समस्या निर्माण होत नाही
(टीप – वरील दिलेल्या माहितीची ItsMajja पुष्टी करत नाही. आंब्याचं सेवन करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.)