बॉलिवूडमध्ये २००४ साली अभिनेता इम्रान हाश्मी व अभिनेत्री मल्लिका शेरावत यांच्या ‘मर्डर’ या चित्रपटाची चांगलीच चर्चा रंगली होती. या चित्रपटामध्ये दोघांच्या असलेल्या बोल्ड सीनमुळे अधिक चर्चा झाली होती. या चित्रपटाच्या निमित्ताने इम्रान व मल्लिकाच्या नवीन जोडीला प्रेक्षकांनी खूप पसंत केले. पण नंतर मात्र ते दोघेही कोणत्याही चित्रपटांमध्ये एकत्र दिसून आले नाहीत. पण आता तब्बल २० वर्षांनी हे दोघेही एकत्र पाहायला मिळाले. यामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप आनंद झाला. दोघांचाही एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यावर त्यांच्या चाहत्यांनी खूप प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. (emraan hashmi and mallika shearawat )
‘मर्डर’ या चित्रपटाला चांगलेच यश मिळाले होते. या चित्रपटामुळे मल्लिका रातोरात स्टारदेखील झाली. नुकतीच ती निर्माते आनंद पंडित यांच्या मुलीच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये दिसून आली होती. त्याच वेळी तिथे इम्रानदेखील दिसून आला. त्यावेळी दोघांनीही फोटोग्राफर्सना एकत्र पोज दिल्या. त्यावेळी मल्लिकाने गुलाबी रंगाचा वेस्टर्न ड्रेस परिधान केला होता तर इम्रान काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसून आला. दोघेही एकत्र खूप छान दिसत होते.
दोघांनी एकत्र पाहून सगळ्यांनाच खूप आनंद झाला होता. ‘मर्डर’ चित्रपटावेळी दोघांमध्ये भांडणं झाली होती. त्यामुळे दोघंही गेली २० वर्ष एकमेकांशी बोलले नव्हते. पण आता २० वर्षांचा अबोला संपवून ते पुन्हा एकदा एकमेकांचे चांगले मित्र झाले आहेत. हे पाहून त्यांच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला.
आणखी वाचा – देशमुखांच्या घरात पडणार फूट? संजनाने उभारली वेगळी गुढी, अनिरुद्धचा राग अनावर
दरम्यान त्यांच्या भांडणाबद्दल मल्लिकाने एका मुलाखतीमध्ये खुलासा केला होता. यामध्ये तिने सांगितले होते की, “मर्डरच्या वेळी आमच्यामध्ये किसींग सीन होते. त्यामुळे काही कारणांमुळे आमच्यात भांडणं झाली होती. चित्रीकरण सुरु असताना आणि त्यानंतरदेखील आम्ही एकमेकांशी बोलत नव्हतो. आता हे सर्व मला बालिश वाटत आहे. त्यावेळी आमच्यामध्ये कदाचित काही गैरसमज झाले होते. ज्याला काहीही अर्थ नव्हता”.
दरम्यान २० वर्षांनी एकत्र आल्यानंतर त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या असून एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “जबरदस्त जोडी, आम्ही यांना कधीही विसरणार नाही”, दुसऱ्या नेटकाऱ्याने लिहिले आहे की, “त्यांना पुन्हा एकदा एकत्रितपणे काम करताना बघायची इच्छा आहे”, तिसरा नेटकरी लिहितो की, “मल्लिका खूप सुंदर दिसत आहे”.