प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. आयुष्यात कधी कधी असं घडताना दिसतं की, कठोर परिश्रम करुनही अपेक्षित परिणाम मिळत नाही. विशेषतः याचा परिणाम आपल्या आर्थिक गोष्टीवर होतो. आपण पैसे वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो पण तरीही खर्च हा वाढतच जात असल्याचं कळतं. वास्तुशास्त्रानुसार, आपल्या आयुष्यात आर्थिक अडचणी येतात वा अशी परिस्थिती उद्भवते जेव्हा तुमच्या आसपासची नकारात्मकता अधिक वाढलेली असते. अशा परिस्थितीत काही वास्तु उपाय करुन तुम्ही तुमची आर्थिक स्थिती मजबूत करु शकता. (Vastu Shastra Tips)
वास्तुशास्त्रानुसार काही बारीक सारीक गोष्टी आहेत ज्या तुमच्यातील या नाकारात्मकेतला दूर करुन तुमची भरभराट करु शकतात. वास्तुशास्त्रानुसार, घराच्या पूर्व किंवा उत्तर दिशेला तुळशीचे रोप अवश्य ठेवावे. यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि तुमच्यावर कर्ज असल्यास तेही कमी होईल. घरामध्ये तुळशीचे रोप लावल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहते, असं मानलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार पाणी सोडून ठेवू नये. विशेषत: नळ वा टाक्यांमधून टपकणारे पाणी घरावर आर्थिक संकट आणते. पाणी कधीही वाया जाऊ देऊ नका. त्यामुळे अनावश्यक खर्च वाढतो. याशिवाय पाण्याचा अपव्यय करुन पैसे खर्च करण्याच्या समस्येलाही तोंड द्यावे लागते. वास्तुशास्त्रानुसार, जर तुम्हाला घरामध्ये देवी लक्ष्मीचे आगमन हवे असेल तर घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी स्वच्छ ठेवावे. यामुळे लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्या पाठीशी राहते. तसेच सायंकाळच्या वेळी मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा, यामुळे घरात आर्थिक समृद्धीही येते.
वास्तुशास्त्रानुसार घराचे मंदिर कधीही दक्षिण दिशेला नसावे. दक्षिण दिशेला मंदिर असणे शुभ मानले जात नाही. जर तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला मंदिर असेल तर तुम्हाला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. घराचे मंदिर नेहमी उत्तर वा पूर्व दिशेला असणे केव्हाही चांगले असते. वास्तुशास्त्रात दिलेल्या या काही टिप्स आहेत, ज्या तुम्हाला तुमच्या आर्थिक अडचणींचा सामना करण्यापासून वाचवू शकतात.