आजच्या काळात मुरुम तसेच त्वचेची काळजी संबंधित अनेक समस्या उद्भवताना दिसत आहेत. आपल्याला माहित आहे की, त्वचेची समस्या एकदा सुरु झाली की ती सहजासहजी बरी होत नाही. आपण आपली त्वचा सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक त्वचेच्या काळजी घेणाऱ्या प्रॉडक्टचा वापर करतो. विशेषतः महिला कलाकारांमध्ये त्वचेच्या बाबतीत अधिक काळजी घेतली जाते. त्वचेसाठी अनेक उत्पादने वापरत ते या समस्या दूर करताना दिसतात. यांत त्या सॅलिसिलिक ऍसिड या एका रसायनाचा वापरत करतात, ज्यामुळे त्वचेची काळजी घेतली जाते. (Skincare Routine Update)
मुरुम व काळे डाग यांसारख्या त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी हे रसायन प्रभावी ठरते. पण या रसायनाची गरज कोणाला आहे? प्रत्येकजण ते वापरु शकतो का? त्वचारोगतज्ज्ञ डॉ.आंचल पंतने इंस्टाग्रामवर याबाबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कोणत्या लोकांनी सॅलिसिलिक ऍसिड वापरावे हे सांगितले आहे. याशिवाय हे रसायन वापरण्याची पद्धतही त्यांनी शेअर केली आहे.
तेलकट त्वचा हे डाग येण्याचे मुख्य कारण आहे. हे डाग चेहऱ्याचे सौंदर्य बिघडवतात. त्यामुळे ज्यांची त्वचा अत्यंत तेलकट आहे, त्यांनी सॅलिसिलिक ऍसिड वापरणे आवश्यक आहे. त्यामुळे पेशींचा चिकटपणा कमी होतो. याशिवाय, हे ग्रंथीद्वारे तयार होणारे तेल सहजपणे काढून टाकण्यास देखील मदत करते. हे रसायन त्वचेवरील अतिरिक्त तेल काढून टाकण्यास आणि सीबम पातळी कमी करण्यात मदत करू शकते. सॅलिसिलिक ऍसिड हे बीटा हायड्रॉक्सी ऍसिड आहे. त्यात दाहक-विरोधी व बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा गुणधर्म आहेत. त्यामुळे खोल एक्सफोलिएशनसाठी हा एक चांगला घटक आहे. विशेषतः ते ब्लॅकहेड्स व व्हाईटहेड्स कमी करण्यासाठी काम करते. ज्यांच्या चेहऱ्यावर खूप ब्लॅकहेड्स व व्हाईटहेड्स आहेत त्यांच्यासाठी सॅलिसिलिक ॲसिडचा वापर फायदेशीर आहे. तज्ज्ञांच्या मते, गरजेनुसार ते क्लीन्सर व सीरम दोन्ही म्हणून वापरले जाऊ शकते.
त्वचा तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या वेळी सॅलिसिलिक ॲसिड वापरणे चांगले. परंतु जर तुम्ही आधीच रात्रीच्या वेळी रेटिनॉल वापरत असाल तर तुम्ही सकाळी सॅलिसिलिक ऍसिड देखील वापरु शकता. याशिवाय, जर तुम्हाला दिवसा जास्त वेळ सूर्यप्रकाशात राहावे लागत असेल, ज्यामुळे त्वचा खूप लवकर टॅन होते, तर रात्रीच्या वेळी हे रसायन वापरणे चांगले असते. सॅलिसिलिक ॲसिडचे फक्त दोन थेंब तुमच्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहेत. सॅलिसिलिक ऍसिड वापरताना, आपण नेहमी चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर वापरावे. जर त्वचेवर ब्लॅक हेड्स किंवा व्हाईट हेड्स असतील तर तुम्ही या भागावर सॅलिसिलिक ॲसिड लावा. बाकी चेहऱ्यावर तुम्ही मॉइश्चरायझर लावू शकता. जर तुम्हाला आधीच सॅलिसिलिक ऍसिडची ऍलर्जी असेल तर तुमच्या डॉक्टरांशी याबाबत बोलून घ्या.
(टिप – वरील दिलेला उपाय करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या ओळखीच्या डॉक्टरांचा अवश्य सल्ला घ्या.)