शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“कट रचून गर्भाशय काढलं अन्…” बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीने केले गंभीर आरोप

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 11, 2026 | 5:40 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Udit Narayan Controversy

सुप्रसिद्ध गायकाच्या पहिल्या पत्नीने केले गंभीर आरोप

Udit Narayan Controversy : सुप्रसिद्ध गायक उदित नारायण पुन्हा एकदा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या पहिल्या पत्नी रंजना नारायण झा यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. रंजनांनी पती उदित नारायण तसेच काही नातेवाईक आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीविरोधात गंभीर तक्रार दाखल केली असल्याची माहिती समोर आली आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, रंजनांनी आरोप केला आहे की, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांबाबत त्यांना फसवण्यात आले. असं त्यांनी म्हटलं आहे.

१९८४ साली उदित नारायण आणि रंजना यांचा विवाह झाला होता. त्यानंतर उदित नारायण १९८५ मध्ये करिअरसाठी मुंबईत आले आणि हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र काही वर्षांनंतर उदित यांनी दुसरे लग्न केल्याची माहिती रंजनाला माध्यमांद्वारे समजल्याचं सांगितलं जात आहे. रंजनांच्या दाव्यानुसार, १९९६ मध्ये उपचाराच्या कारणाने त्यांना एका रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांच्या नकळत त्यांचे गर्भाशय काढण्यात आले.

आणखी वाचा – “त्याच्यामुळे माझं करिअर उध्वस्त…” अभिनेत्री अरुणा इराणीचा सुप्रसिद्ध अभिनेत्याबाबत खुलासा; म्हणाली, “माझा गैरफायदा…”

या घटनेदरम्यान उदित नारायण आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नीची उपस्थिती होती, असा आरोपही त्यांनी केला आहे. यासोबतच मुंबईत गेल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन झाल्याचं आणि त्यांना घरात प्रवेश नाकारण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर त्यांनी महिला आयोगाकडे धाव घेतली. संबंधित तक्रारीदरम्यान उदित नारायण यांनी रंजना या आपल्या पत्नी असल्याचं मान्य केल्याची माहितीही समोर आली आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे उदित नारायण यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे, या आरोपांवर त्यांची अधिकृत प्रतिक्रिया काय असेल?, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा – Ranveer Singh ला बिश्नोई गँगकडून धमकी, करोडो रुपयांची मागणी केली अन्…; घराबाहेर कडक सुरक्षा

Tags: bollywood newsentertainment newsUdit Narayan Controversy
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Vishal-Akshaya Wedding

उत्तराखंडमध्ये विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ; त्रियुगीनारायण मंदिरात शाही विवाहसोहळा संपन्न, 'तो' व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.