शनिवार, मे 30, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उत्तराखंडमध्ये विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ; त्रियुगीनारायण मंदिरात शाही विवाहसोहळा संपन्न, ‘तो’ व्हिडीओ समोर

Majja Webdeskby Majja Webdesk
फेब्रुवारी 12, 2026 | 9:48 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Vishal-Akshaya Wedding

विशाल-अक्षयाने बांधली लग्नगाठ

Vishal-Akshaya Wedding : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ३ चा विजेता आणि ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता विशाल निकम सध्या खास कारणामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी विशालने आपल्या प्रेमाची कबुली देत चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला होता. त्यानंतर अभिनेता विशाल निकम आणि अभिनेत्री अक्षया हिंदळकर यांचा साखरपुडा तसेच हळदी समारंभ पार पडल्याच्या बातम्यांनी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.

आता या चर्चांना पूर्णविराम देत विशाल आणि अक्षया विवाहबंधनात अडकले आहेत. विशेष म्हणजे १० फेब्रुवारी रोजी विशालचा वाढदिवस असून, याच खास दिवशी दोघांनी लग्नगाठ बांधली. वाढदिवस आणि लग्न असा दुहेरी आनंद एकाच दिवशी साजरा करत विशालने आयुष्यातील नवा अध्याय सुरू केला आहे. अद्याप दोघांच्या लग्नाचे अधिकृत फोटो सोशल मीडियावर शेअर झालेले नाहीत. मात्र विशालने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. त्याने लिहिलं, “आज १० फेब्रुवारी २०२६ माझा वाढदिवस! सर्वांच्या शुभेच्छांसाठी मनापासून धन्यवाद. प्रवासाच्या घाईमुळे फोन किंवा संदेशांना उत्तर देता आलं नाही, त्याबद्दल क्षमस्व. आजच्या या पवित्र दिवशी महादेव आणि माता पार्वती यांच्या आशीर्वादाने मी आणि माझी सखी अक्षयाने सात जन्मांची गाठ बांधली. लग्न सोहळा सुफळ संपूर्ण पार पडला. फोटो उद्या अपडेट करेन. हर हर महादेव.” असं लिहीत त्याने भावना व्यक्त केल्या आहे.

आणखी वाचा – “Overacting, हिला कुणी घेतलं? हे शब्द…”, ट्रोल करणाऱ्यांची विशाखा सुभेदार यांच्याकडून कानउघडणी, म्हणाल्या, “प्रेक्षक विसरतो…”

View this post on Instagram

A post shared by VISHHAL NIKAM (@vishhalnikam)

अखेर विशालने लग्नाचा सुंदर व्हिडीओ शेअर करत आपल्या पत्नींसाठी खास पोस्ट लिहिली. या जोडप्याचा साखरपुडा हरिद्वारमध्ये पार पडला होता. त्यानंतर उत्तराखंडमधील पवित्र मंदिरात अत्यंत पारंपरिक पद्धतीने विवाहसोहळा संपन्न झाला. लग्नासाठी दोघांनीही पारंपरिक पेहराव केला होता. अक्षया नारंगी रंगाच्या सुंदर लेहंग्यात, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा आणि पारंपरिक दागिन्यांमध्ये अत्यंत देखणी दिसत होती. तर विशालनेही पारंपरिक वेषात सर्वांचे लक्ष वेधून घेतले. लग्नाचा व्हिडीओ शेअर करत विशालने लिहिले, “चंद्रभागेसारखं प्रेम आपलं सखी… मी तुझ्यात सामावून जाईन. रुसली जरी तू रखुमाईसारखी, मी सावळा विठ्ठल होऊन जाईन… कायम तुझा रुसवा काढत तुला आयुष्यभर मनवत राहीन. १० फेब्रुवारी २०२६!” विशालच्या या पोस्टने चाहत्यांचे मन जिंकले आहे. व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी या नव्या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आणखी वाचा – “त्याच्यामुळे माझं करिअर उध्वस्त…” अभिनेत्री अरुणा इराणीचा सुप्रसिद्ध अभिनेत्याबाबत खुलासा; म्हणाली, “माझा गैरफायदा…”

Tags: marathi entertainment newsvishal-akshaya weddingwedding news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

ankita lokhande vicky jain abu dhabi vacation
Entertainment

हिजाब परिधान करणं सुप्रसिद्ध अभिनेत्रीला पडलं महागात, नेटकऱ्यांची नाराजी, म्हणाले, “मराठी असूनही…”

मे 29, 2026 | 10:20 am
The Maharashtra Files Marathi Movie
Entertainment

‘द महाराष्ट्र फाईल्स’ चित्रपटाचे तांत्रिक अडचणी आणि सेन्सॉर बोर्डाच्या बदलांमुळे प्रदर्शन पुढे, नवीन तारीख लवकरच होईल जाहीर

मे 29, 2026 | 12:00 pm
shashank shende role in ghabadkund
Entertainment

शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, ‘घबाडकुंड’ चित्रपटातील लूकची चर्चा

मे 28, 2026 | 10:01 am
veteran actor ramakant dayama death
Entertainment

‘चक दे इंडिया’ फेम अभिनेत्याचे निधन, वयाच्या ६५व्या वर्षी निधन, सहकलाकाराची भावुक पोस्ट

मे 26, 2026 | 2:16 pm
Next Post
Bigg Boss Marathi 6

"तू नल्ला आहेस" म्हणताच रोशन राखीवर संतापला, घरात राडा; म्हणाला, "तुझ्या जागी मुलगा असता तर फुटला असता"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.