Ranveer singh receives threat : रोहित शेट्टीच्या घरी झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगला मंगळवारी व्हॉट्सॲपवर धमकीचा मॅसेज आला. ज्यात करोडो रुपयांची मागणी करण्यात आली. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. धमकीचा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत. मात्र, रणवीर सिंग किंवा त्याच्या टीमने अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. धमकी मिळाल्यानंतर मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. धमकीची व्हॉईस नोट पाठवणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेत आहेत.
मात्र, रणवीर सिंग किंवा त्याच्या टीमने अद्याप कोणतीही औपचारिक तक्रार दाखल केलेली नाही. दरम्यान, अभिनेत्याच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. धमकीनंतर, मुंबई पोलिसांना माहिती देण्यात आली. रणवीर सिंगच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा धमकीचा मेसेज पाठवणाऱ्याने स्वतःला कुख्यात बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचं सांगितलं असून त्याचा तपास करण्यासाठी पोलिस सायबर सेलची मदत घेत आहेत.
यापूर्वी, ३१ जानेवारीच्या रात्री उशिरा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहूच्या घराबाहेर पाच राऊंड गोळीबार करण्यात आला होता. त्यावेळी रोहित शेट्टी घरी उपस्थित होता. मात्र, गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. याप्रकरणी पुण्यातून ५ संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.





