शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

२२ वर्षांपूर्वीच्या अपघाताचं सत्य समोर; नागराज देणार गुन्ह्याची कबुली, ‘तो’ व्हिडीओ पाहून अर्जुन-सायलीला धक्का

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 27, 2026 | 11:49 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag

नागराज देणार गुन्ह्याची कबुली

Tharal Tar Mag: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. दरम्यान नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये रविराज व प्रतिमा यांचा २२ वर्षांपूर्वी जो अपघात झाला होता त्याचा मास्टरमाइंड दुसरा-तिसरा कोणी नसून नागराज किल्लेदार होता याचा खुलासा मालिकेत होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सायली-अर्जुन या सत्याच्या शोधात होते. त्याचबरोबर सुमन काकूला किडनॅप करण्यामागे सुद्धा नागराजच आहे हे सत्य उघडकीस आल्यावर सायली-अर्जुन या दोघांनाही मोठा धक्का बसतो. आता मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा: देबिना बॅनर्जीच्या लेकींनी गायलं राष्ट्रगीत, मागे उभ्या असलेल्या महिलांना बोलताना पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, “लाज वाटते…”

रविराज व प्रतिमाच्या अपघातामागे महिपत शिखरेचा हात आहे. हे आधीच सर्वांसमोर उघड झालेलं आहे. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या महिपतची अर्जुनने कसून चौकशी केली. मात्र, नागराजनं दिलेल्या धमकीमुळे महिपत कबुली देत नाही. पण, या सगळ्या प्लॅनचा मुख्य मास्टरमाइंड कुणीतरी वेगळाच आहे याची खात्री अर्जुनला असते. नागराजचा यामध्ये हात असल्याचा संशय अर्जुन-सायलीला असतो. त्यासाठी अर्जुन-सायलीच्या प्लॅनमध्ये सुमनही सहभागी होते.पण, आता नागराजच या सगळ्याचा मास्टरमाइंड आहे हे सत्य समोर आलं आहे. तर सायली-अर्जुनशी हातमिळवणी करणं सुमनला चांगलंच महागात पडणार आहे. घरी आल्यावर नागराज तिला मारहाण करतो आणि तिच्यासमोर आपल्या गुन्ह्याची कबुली देतो. पण, या सगळ्याचं दाराआडून रेकॉर्डिंग केलं जातं. हा व्हिडीओ आता अर्जुन-सायलीपर्यंत पोहोचणार आहे असं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. (Tharal Tar Mag)

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

तर आता हा व्हिडीओ सायली आणि अर्जुच्या हाती लागला आहे. अखेर नागराजचं खरं रूप समोर आल्यावर सायली आणि अर्जुन आता नेमकं काय करणार? आणि त्यावर रविराजची काय प्रतिक्रिया असेल, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. (Tharal Tar Mag)

आणखी वाचा: उपेंद्र लिमयेंच्या खलनायकी भूमिकेची चर्चा, ‘मन आतले मनातले’ चित्रपटातून येणार भेटीस, टिझरने वाढविली उत्सुकता

Tags: amit bhanushalijui gadjkarimarathi malikastar pravahtharal tar mag
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Ghabadkund Movie
Entertainment

घुंगरांचा आवाज, रहस्य थरार अन्…; सोन्याच्या मोहात विहिरीत उतरले संदीप पाठक, ‘घबाडकुंड’ मिळणार का?

एप्रिल 17, 2026 | 11:15 am
Next Post
Ankita walawalkar sad post for Late Prathamesh kadam

"काही नाती वेळेवर निभावता आली नाहीत", लोकप्रिय रीलस्टारच्या निधनानंतर अंकिता वालावलकर भावुक, म्हणाली, "तुझ्या आईला…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.