Debina bonnerjee daughters : ‘लाफ्टर शेफ सीझन 3’मधून बाहेर पडल्यानंतर देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी आता कुटुंबासोबत बराच वेळ घालवत आहेत. देबिना अनेकदा तिच्या मुलींसझ वेळ घालवते. असाच काहीसा प्रकार नुकताच घडला. प्रजासत्ताक दिनानिमित्त देबिनाने आपल्या मुलींसोबत तिरंगा फडकवतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये दोघीही सुंदर आवाजात जन-गण-मन गाताना दिसत आहेत. देबिना बॅनर्जी यांच्या लाडक्या मुलींना जन-गण-मन गाताना पाहून लोक वेडे झाले आहेत. दोघेही खूप गोड आवाजात गात आहेत आणि दोघींनी यावेळी नऊवारी साडी नेसलेली आहे. देबिनाही मुलींबरोबर उभी आहे, मात्र काही युजर्स मागे उभ्या असलेल्या लोकांना पाहून हैराण झाले आहेत आणि त्यांच्याकडे शिष्टाचार नाही का असा प्रश्न उपस्थित केला. राष्ट्रगीत वाजत आहे आणि ते असे उभे राहून बोलत आहेत.
हा व्हिडीओ पाहून एका युजरने लिहिले, “मागे उभ्या असलेल्या लोकांचा आदर कसा करावा हे माहित नाही, किमान बोलू तरी नका”. तर एकाने लिहिले आहे की, “राष्ट्रगीत सुरु असताना मागे उभ्या असलेल्या लोकांना लाज वाटते”. एकजण म्हणाला, “राष्ट्रगीत हा विनोद नाही, नीट गा, तुम्ही उभे राहून विनोद करत आहात”.
आणखी वाचा – ‘मुरांबा’ फेम अभिनेत्याचं थाटामाटात लग्न; पारंपरिक पद्धतीनं पार पडला विवाहसोहळा, अभिनेत्याची पत्नी आहे…
‘लाफ्टर शेफ सीझन 3’ बद्दल बोलायचे तर, त्याची सुरुवात एका नवीन संकल्पनेसह आणि अनेक नवीन कलाकारांसह झाली. या सीझनमध्ये व्हिव्हियन डिसेना, तेजस्वी प्रकाश, गुरमीत चौधरी, देबिना बॅनर्जी, ईशा सिंग आणि ईशा मालवीय यांच्यासह मागील हंगामातील अनेक ओळखीचे चेहरे देखील होते. स्पर्धकांना दोन संघांमध्ये विभाजित करणारे नवीन स्वरुप लोकांना आवडले नाही. परिणामी, लाँच झाल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत शोमध्ये मोठे बदल करण्यात आले.
आणखी वाचा – उपेंद्र लिमयेंच्या खलनायकी भूमिकेची चर्चा, ‘मन आतले मनातले’ चित्रपटातून येणार भेटीस, टिझरने वाढविली उत्सुकता
रविवारी, निर्मात्यांनी अचानक ‘लाफ्टर शेफ’ सीझन ३च्या मिड-सीझन फिनालेसह टीमची संकल्पना संपवली. विवियन, ईशा मालवीय, ईशा सिंग, गुरमीत आणि देबिना यांनी शो सोडल्यानंतर हे घडले. रिपोर्ट्सनुसार, शेड्यूलमधील संघर्ष आणि पूर्वीच्या वचनबद्धतेमुळे पाचही कलाकारांनी शो सोडला. असे सांगितले जात आहे की विवियन लवकरच कलर्स टीव्हीवरील दुसऱ्या शोमध्ये दिसणार आहे, तर ईशा मालवीयने एका नवीन प्रोजेक्टची शूटिंग सुरू केली आहे. गुरमीत आणि देबिनाही इतर कामात व्यस्त आहेत.




