मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

उपेंद्र लिमयेंच्या खलनायकी भूमिकेची चर्चा, ‘मन आतले मनातले’ चित्रपटातून येणार भेटीस, टिझरने वाढविली उत्सुकता

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जानेवारी 27, 2026 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Upendra Limye Marathi Movie

उपेंद्र लिमयेंच्या खलनायकी भूमिकेची चर्चा, 'मन आतले मनातले' चित्रपटातून येणार भेटीस, टिझरने वाढविली उत्सुकता

Upendra Limye Marathi Movie : अनेक मराठी, हिंदी, दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारलेले अभिनेते उपेंद्र लिमये आता दमदार खलनायकी भूमिकेत दिसणार आहेत. ‘मन आतले मनातले’ या चित्रपटात त्यांनी खलनायकी भूमिका साकारली असून, या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाचा टीजर लाँच करण्यात आला आहे. १३ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘सूर्य फिल्म वर्ल्ड’ प्रस्तुत ‘मन आतले मनातले’ या चित्रपटाची निर्मिती सुरेन महापात्रा यांनी केली आहे. सुरेन महापात्रा यांनी चित्रपटाचं कथा आणि पटकथा लेखन, तर संवादलेखन मनोज सुधाकर येऊनकर यांनी केले आहे. तर जेम्स अँथनी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.

अभिजित मजुमदार यांनी संगीत दिग्दर्शन, डॉ. सुनंदा डिवरे पळवणकर यांनी गीतलेखन केलं आहे. सुदर्शन सेनापती यांनी छायांकन, मलया आणि बिपिन यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. चित्रपटात सुरेन, मानसी नाईक, उपेंद्र लिमये, ऋतुराज फडके, संदीप गायकवाड, कमलेशन सावंत, अरूण नलावडे, यतीन कार्येकर, सिया पाटील, राजेश आहेर, विनित भोंडे अशी तगडी स्टारकास्ट आहे. ‘सूर्य फिल्म वर्ल्ड’ या निर्मिती संस्थेने आजवर ओडिया, हिंदी, तेलुगू, तमिळ, बंगाली भाषांतील चित्रपटांची निर्मिती केली आहे. आता मन आतले मनातले या चित्रपटातून ही निर्मिती संस्था मराठीमध्ये पदार्पण करत आहे.

आणखी वाचा – रितेश देशमुख भडकताच अनुश्री माने हसली आणि…; भाऊंचा पारा चढला म्हणाले, “ए…”

थॅलेसेमिया, गिल्बर्ड सिंड्रोम या आजारावर औषध शोधण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या एका डॉक्टर दांपत्याला औषधाचा शोध लागतो. या आजारांना त्यांचा मुलगाही तोंड देत असतो. शोध लागलेल्या औषधाचा प्रयोग ते आपल्या मुलावर करतात. पण त्या औषधाचा परिणाम नक्की कसा होतो त्यानंतर वेगवेगळी वळणे घेत कथेत अनेक नाट्यमय घडामोडी घडतात. त्या मुलाचे नेमके काय होते याचे उत्तर चित्रपटात पहायला मिळणार आहे.

आणखी वाचा – ‘मुरांबा’ फेम अभिनेत्याचं थाटामाटात लग्न; पारंपरिक पद्धतीनं पार पडला विवाहसोहळा, अभिनेत्याची पत्नी आहे…

राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेते उपेंद्र लिमये यांनी प्रत्येक भूमिकेत खणखणीत अभिनय करुन मराठी, हिंदी, दाक्षिणत्य चित्रपटात स्वतःची ओळख निर्माण केली आहे. ‘मन आतले मनातले’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतला वेगळा चित्रपट ठरणार आहे. त्यांची खलनायकी भूमिका हे चित्रपटाचं महत्त्वाचं आकर्षण ठरणार आहे. चित्रपटाच्या टीजरमध्येही उत्तम अॅक्शन सिक्वेन्स दिसत असून, या टीजरमुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढली आहे.

Tags: entertainmentmarathi movieUpendra Limye
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Debina bonnerjee daughters

देबिना बॅनर्जीच्या लेकींनी गायलं राष्ट्रगीत, मागे उभ्या असलेल्या महिलांना बोलताना पाहून नेटकरी भडकले, म्हणाले, "लाज वाटते…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.