टेलिव्हिजनवरील ‘द कपिल शर्मा शो’ हा नेहमीच चर्चेत राहणारा कार्यक्रम ठरला आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ही कपिल शर्माची असते. यामध्ये अनेक कलाकार चित्रपटाच्या प्रमोशनसाठी येत असतात. तसेच या कार्यक्रमामध्ये परीक्षक म्हणून नवज्योत सिंह सिद्धू बसलेले दिसून आले होते. मात्र ते काही कालावधीनंतर कार्यक्रमातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांच्या जागी अर्चना पूरण सिंह दिसून आली. अर्चनाला चाहत्यांनी खूप पसंती दर्शवली. अशातच आता पुन्हा एकदा नवज्योत दिसून आले. नवज्योत यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. (the great indian kapil show)
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सिद्धू हे अर्चनाच्या खुर्चीवर बसलेले दिसत. तसेच सिद्धू यांची मंचावर एंट्री होताच तिथे असलेल्या प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. त्यानंतर कपिल म्हणतो की, “मी इथे काय करत आहे?”, इतक्यात तिथे असणाऱ्या सिद्धू यांच्याकडे कपिलची नजर जाते आणि तो आश्चर्यचकित होतो”, नंतर तिथेच अर्चना येते आणि कपिलला म्हणते की, “त्या सरदारांना माझ्या खुर्चीवरुन उठायला सांग. त्यांनी ताबा घेतला आहे”. यावेळी अर्चना खूप आश्चर्यचकित तसेच घाबरलेली दिसत आहे.
यानंतर या कार्यक्रमामध्ये हरभजन सिंहदेखील दिसून आला. त्यावेळी तो म्हणतो की, “जगात कोणाच्याही काहीही बोलण्याने कोणी बुद्धू बनत नाही आणि खुर्चीवर बसणारा कोणीही सिद्धू बनत नाही”, एवढे बोलल्यानंतर सिद्धू व हरभजन सिंह हे गळाभेट घेतात.
या कार्यक्रमामध्ये सिद्धू यांची पत्नीदेखील त्यांच्याबरोबर दिसून येते. त्या म्हणतात की, “आमच्या लग्नाला ३२ वर्ष झाली आहेत. यावेळी सिद्धू खूप धमाल करताना दिसतात. सगळ्यांना खूप हसवतात. तसेच या कार्यक्रमात खुर्चीला घेऊन खूप चढाओढदेखील बघायला मिळते. तसेच यावेळी सुनील ग्रोव्हर सिद्धू यांच्या रुपात बघायला मिळतो.