बॉलिवूड अभिनेते अन्नू कपूर सध्या खूप चर्चेत आहेत. आजवर त्यांनी अनेक मालिका-चित्रपटांमध्ये काम केले आहे. नुकतेच त्यांनी अमेरिकन नागरीकत्त्वाबद्दल बोलताना गीता व इस्लामबद्दल भाष्य केले आहे. एका ठिकाणी त्यांनी स्वतःला नास्तिक म्हंटले आहे तर दुसरीकडे त्यांनी गीता महान असल्याचे सांगितले आहे. अन्नू यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये देशभक्तीची तुलना सुंगधी अत्तराबरोबर केली आहे. अन्नू हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही अधिक चर्चेत राहिले आहेत. आतापर्यंत अन्नू हे तीन वेळा लग्नबंधनात अडकले आहेत. १९९२ साली ते अमेरिकन वंशाच्या अनुपमाबरोबर लग्नबंधनात अडकले. मात्र त्यांचे हे लग्न एका वर्षापेक्षा अधिक काळ टिकू शकले नाही. त्यांनंतर ते अजून दोन वेळा लग्नबंधनात अडकले. (annu kapoor on indian citizenship)
पहिले लग्न मोडल्यानंतर ते दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकले. हे लग्न जवळपास १० वर्ष टिकले. त्यानंतर दुसऱ्या पत्नीपासूनदेखील ते वेगळे झाले आणि पुन्हा एकदा ते पहिल्या पत्नीबरोबर लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुलं आहेत. पत्नी-मुलं अमेरिकन असतानाही अन्नू यांनी कधीही अमेरिकन होण्याचा विचार नाही केला. परदेशात राहण्यासाठी त्यांनी कधीही प्रयत्न केले नाहीत, तसेच याबद्दल त्यांनी पत्नी व मुलांवरदेखील जबरदस्ती केली नाही. त्यांनी सांगितले की, “जसे १५ ऑगस्ट व 2६ जानेवारी येते तेव्हा लोकांच्या मनात देशभक्ती जागी होते. तसेच क्रिकेटच्या मैदानात झेंडा हातात घेतल्यावर देशभक्ती आठवते”.
पुढे ते म्हणाले की, “देशभक्ती सुगंधित अत्तर नाही की कोणत्या कार्यक्रमाला जाताना, लग्नात जाताना मारला जातो. देशभक्ती तुमच्या शरीरात २४ तास रक्ताप्रमाणे वाहिली पाहिजे. त्यामुळे मला लोकांना हेच सांगायचं आहे की जर तुमची देशभक्ती ही वेळ किंवा एखाद्या खास दिवसांवर अवलंभून असेल तर ती देशभक्ती नाही”.
नंतर अन्नू म्हणाले की, “माझी पत्नी अमेरिकन आहे पण मी कधीही अमेरिकन नागरिकत्वासाठी अर्ज केला नाही. मी मरेन पण तिकडचा पासपोर्ट घेणार नाही. मी खूप एकनिष्ठ असा व्यक्ती आहे. हा देश मला खड्ड्यात टाकुदे किंवा मला काहीही नको मिळूदे पण मी माझ्या देशाशी एकनिष्ठ राहणार”. काही दिवसांपूर्वी अन्नू यांनी धर्मग्रंथावरदेखील भाष्य केले होते. त्यावेळीदेखील ते खूप चर्चेत आले होते.