12th Fail या चित्रपटामुळे प्रसिध्दीझोतात आलेला लोकप्रिय अभिनेता म्हणजे विक्रांत मेस्सी. या चित्रपटामुळे विक्रांतला त्याच्या व्यावसायिक आयुष्यात प्रचंड यश मिळाले. अशातच आता अभिनेता त्याच्या आगामी ‘द साबरमती रिपोर्ट’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सध्या सर्वत्र या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. एकेकाळी स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे विक्रांत मेस्सीही भाजप सरकारला खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे अनेकजण सांगत आहेत. तो एका प्रोपगंडा चित्रपटात काम करत आहे असं म्हटलं आहे. अशातच आता विक्रांतने एका मुलाखतीत अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत, ज्यातून त्याने त्याच्या कुटुंबात विविधतेत एकता कशी दिसते हे सांगितले आहे. (Vikrant Massey On Secularism)
शुभंकर मिश्रा यांनी त्यांच्या पॉडकास्टमध्ये विक्रांतला म्हटलं की, एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे की विक्रांत धर्मनिरपेक्षतेपासून कट्टर हिंदू कसा झाला. विक्रांत धर्मनिरपेक्ष असायचा असे लोक लिहित आहेत. पण आजकाल चित्रपट निर्माते प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या सगळ्यावर विक्रांत म्हणाला की, काय बघून असं वाटतं की, मी धर्मनिरपेक्ष नाही. एक धर्मनिरपेक्ष माणूसच जात-धर्माचा विचार न करता तुमच्या बाजूने बोलू शकतो. आजही मी धर्मनिरपेक्ष आणि उदारमतवादी आहे. माझ्या दृष्टीने एकत्र राहणे धर्मनिरपेक्ष आहे. एकमेकांच्या संस्कृतीचा आदर करणे, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगणे. इतरांचा अपमान न करणे आणि इतरांना अपमानित करण्यासाठी एखाद्याने स्वतःला मोठे करु नये म्हणजे धर्मनिरपेक्षतावादी होय”.
विक्रांतने पुढे असं म्हटलं आहे की, “माझ्या घराची माहिती आहे का? ही गोष्ट देखील व्हायरल झाली की माझ्या पालकांनी आंतरजातीय विवाह केला आहे (आई शीख व वडील ख्रिश्चन). माझ्या भावाचे धर्मांतर झाले आहे. माझी पत्नी हिंदू ठाकूर आहे. माझ्या मुलाचे नाव वरदान आहे. यापेक्षा धर्मनिरपेक्ष काय असू शकते? विक्रांतने असेही सांगितले की त्याचे वडील ख्रिश्चन आहेत परंतु त्यांनी सहा वेळा वैष्णोदेवीला भेट दिली आहे. त्याचा भाऊ धर्मांतरित मुस्लिम आहे, पण तो देवी लक्ष्मीची पूजा करतो. आम्ही एकत्र दिवाळी साजरी करतो आणि घरी दिवाळी आली की सर्वजण एकत्र बिर्याणी खातो”.
आणखी वाचा – ‘आई कुठे काय करते’चा रिमेक येणार?, मालिका शेवटाकडे असताना दिग्दर्शकांचं भाष्य, म्हणाले, “रिमेक करायला…”
दरम्यान, विक्रांत मेस्सीचा ‘साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट १५ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट गोध्रा घटना आणि त्यानंतरच्या गुजरात दंगलीवर आधारित आहे. ट्रेलर रिलीजनंतर हा चित्रपटही वादात सापडला आहे. चित्रपटाचा मुख्य अभिनेता विक्रांत मॅसीला धमक्या येत आहेत. अनेकजण हा चित्रपट एक प्रोपगंडा चित्रपट असल्याचे म्हणत आहेत. विक्रांत म्हणाला की, गोध्रा घटनेच्या आगीत अनेकांनी आपली पोळी भाजली, पण ज्यांचे बळी गेले ते फक्त आकडेवारीच राहिले.