गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“इंडस्ट्रीत नवोदित कलाकारांना आमिष दाखवलं जातं” पडद्यामागचं काळं सत्य; तनुश्री दत्ताचा धक्कादायक खुलासा

Majja Webdeskby Majja Webdesk
मार्च 14, 2026 | 3:10 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Tanushree Dutta Statement on Industry

तनुश्री दत्ताचा धक्कादायक खुलासा

Tanushree Dutta Statement on Industry : तनुश्री दत्ता नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. दरम्यान, ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून यावेळी तिने चित्रपटसृष्टीतील फसवणूक आणि नवोदित कलाकारांच्या शोषणाबाबत स्पष्ट आणि गंभीर भाष्य केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने मनोरंजनविश्वाच्या पडद्यामागे घडणाऱ्या वास्तवावर प्रकाश टाकत अनेक धक्कादायक गोष्टी सांगितल्या.

‘मेरी सहेली’ला दिलेल्या मुलाखतीत तनुश्रीने सांगितले की, अनेक नवोदित कलाकारांना मोठ्या संधींची आश्वासनं देऊन त्यांना जाळ्यात ओढलं जातं.“तू खूप सुंदर आहेस, तू अभिनेत्री होऊ शकतेस,” अशा गोड बोलांनी त्यांचा विश्वास जिंकून घेतला जातो. आणि नंतर त्यांना कठीण परिस्थितीत अडकवलं जातं,” असं ती म्हणाली. तनुश्री पुढे म्हणाली की, लहानपणी पालक मुलांना अनोळखी लोकांपासून सावध राहण्याचा सल्ला देतात, पण मोठं झाल्यावर अनेकजण तो विसरतात. “लोक तुमच्या स्वप्नांचा आणि महत्त्वाकांक्षेचा गैरफायदा घेतात. ते तुमच्या आशांशी खेळतात,” असंही तिने नमूद केलं. मनोरंजनसृष्टी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत असली, तरी या चमकदार पडद्यामागे अनेक कठोर आणि कटू वास्तव लपलेलं असतं. इंडस्ट्रीमध्ये मोठ्या संख्येने मुलं-मुली आपल्या स्वप्नांसाठी येतात; मात्र काही जण त्यांचा गैरफायदा घेतात, त्यांना मानसिक आणि भावनिक त्रास सहन करावा लागतो आणि शेवटी त्यांना एकटं सोडलं जातं, असा गंभीर आरोप तनुश्रीने केला. (Tanushree Dutta Statement on Industry)

आणखी वाचा – ‘बिग बॉस’मधून प्राजक्ता शुक्रेची एक्झिट, गायिकेचा गेम दिसलाच नाही म्हणून…; सोशल मीडियावर चर्चा

“माझ्याकडे बोलण्यासाठी एक व्यासपीठ आहे, म्हणून मी या विषयावर बोलते आहे. जर माझ्या बोलण्यामुळे काही जण सावध झाले, तर कदाचित काही जीव वाचू शकतील,” असंही ती म्हणाली. तनुश्रीच्या या विधानांमुळे पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टीतील सुरक्षितता, नवोदित कलाकारांचे प्रश्न आणि पडद्यामागील वास्तव यावर चर्चा सुरू झाली आहे. (Tanushree Dutta Statement on Industry)

आणखी वाचा – “तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात”, कपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला सुप्रसिद्ध अभिनेत्रीने झापलं, म्हणाली, “तुमचा फोकस…”

Tags: entertainment newsTanushree Dutta Statement on Industry
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Bigg Boss Marathi 6 Promo

"हा शो स्क्रिप्टेड नाही" , राखीने केलेल्या कृतीवर रितेश भडकला ; म्हणाला, "इथे खेळायचं नाही…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.