रविवार, मे 31, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात”, कपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला सुप्रसिद्ध अभिनेत्रीने झापलं, म्हणाली, “तुमचा फोकस…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मार्च 14, 2026 | 11:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Aishwarya Narkar slams trolls

"तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात", कपड्यांवरुन ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्याला सुप्रसिद्ध अभिनेत्रीने झापलं, म्हणाली, "तुमचा फोकस…"

Aishwarya Narkar slams trolls : सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या नारकर या अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतात. नेहमीच त्या त्यांच्या क्लोथिंग ब्रँडचे, व्यायामाचे आणि ट्रेंडिंग सॉंगवरील रीलचे व्हिडीओ पोस्ट करत असतात. बरं, या सगळ्यात त्यांना बरेचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. आणि या ट्रोलिंगला ऐश्वर्या नारकर पुरेपूर पुरून उरल्या आहेत. नेहमीच त्यांनी विनाकारण ट्रोल करणार्या ट्रॉलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्यांचा फिटनेस आणि उत्साह पाहून अनेकजण थक्क होतात. मात्र, काही नेटकरी त्यांना त्यांच्या कपड्यांवरून किंवा वयावरून ट्रोल करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशातच आता योगासन करतानाच्या व्हिडीओवर नेटकऱ्याने केलेल्या कमेंटवर ऐश्वर्या यांनी उत्तर दिलं आहे.

ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर योगासन करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी व्यायामासाठी सोयीस्कर असे कपडे घातले आहेत. यावर एका नेटकऱ्याने कमेंट करत त्यांना सल्ला दिला की, “कॅमेरासमोर तरी पूर्ण कपडे घालून योगा करत जा”. नेटकऱ्याच्या या कमेंटला उत्तर देत ऐश्वर्या यांनी त्याची कमेंट नावासकट स्टोरीवर शेअर केली आहे. कमेंट शेअर करताना त्यांनी लिहिलं की, “बुरसटलेले विचार सोडा, तुमचा फोकस का हलतोय?”.

आणखी वाचा – ‘बिग बॉस’मधून प्राजक्ता शुक्रेची एक्झिट, गायिकेचा गेम दिसलाच नाही म्हणून…; सोशल मीडियावर चर्चा

ऐश्वर्या यांच्या इन्स्टा स्टोरीवर या नेटकऱ्याने पुन्हा त्यांना उत्तर दिलं. “व्हिडीओला व्ह्यूज येण्यासाठी तुम्ही असे व्हिडिओ बनवता”, असं या नेटकऱ्यानं म्हटलं. त्याच्या याही कमेंटला उत्तर देत ऐश्वर्या यांनी चांगलंच सुनावलं आहे, आणि त्याची बोलतीच बंद केली आहे. नेटकऱ्यानं लिहिलं की, “खरं हा वयोमानाचा मुद्दा आहे. कुणी काय कपडे घालायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुमच्या अशा कपड्यांमुळे लहान मुलं बिघडतात,त्याचं काय करायचं?”. यावर ऐश्वर्या यांनी सडेतोड उत्तर देत असं म्हटलं की, “त्यांना व्यायाम करायला शिकवा. म्हणजे विचारांचा समतोल येईल आणि त्यांचं डोकं शाबुत राहिल. नाहीतर तुमच्यासारखंच होणार मोठे होऊन”.

आणखी वाचा – नीना गुप्ता वयाच्या 66 व्या वर्षी गरोदर? विजय- रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये बेबी बंपची चर्चा

ऐश्वर्या यांच्या या ट्रोलिंगची आणि त्या ट्रोलर्सला दिलेल्या उत्तराची चर्चा सुरु आहे. सध्या ऐश्वर्या त्यांच्या थ्रेड अँड ठुमका या ब्रँडच्या साड्यांच्या व्यवसायात सक्रिय आहेत. अभिनेत्री तितीक्षा तावडे आणि सुरुची अडारकर यांच्यासह मिळून त्यांनी हा नवा ब्रँड सुरु केला आहे.

Tags: aishwarya narkarentertainmentmarathi actress
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Tumbadchi Manjula Makarand Anaspure
Entertainment

‘तुंबाडची मंजुळा’मधील मकरंद अनासपुरेंचा लूक समोर, अभिनेत्याचा साधू अवतार चर्चेत

मे 30, 2026 | 5:08 pm
Gurmeet Choudhary Debina Bonnerjee
Entertainment

अनेक गर्भपात, सरोगसीद्वारे लेकीचा जन्म…; लग्नाच्या ११ वर्षांनी सुप्रसिद्ध अभिनेत्रीची आई होण्याची धडपड, नवऱ्याकडून खुलासा

मे 30, 2026 | 2:00 pm
Star Pravah Latest News
Entertainment

तीन महिन्यांत आठ नवेकोरे कार्यक्रम; स्टार प्रवाह वाहिनीची मोठी घोषणा, दिग्गज कलाकार झळकणार

मे 30, 2026 | 12:30 pm
 Rekha and Amitabh Bachchan
Entertainment

अभिनेत्यासह संध्याकाळ एकत्र घालवायला सुप्रसिद्ध अभिनेत्रीची भलतीच मागणी, खलनायकाचा खुलासा

मे 30, 2026 | 11:29 am
Next Post
Tanushree Dutta Statement on Industry

"इंडस्ट्रीत नवोदित कलाकारांना आमिष दाखवलं जातं" पडद्यामागचं काळं सत्य; तनुश्री दत्ताचा धक्कादायक खुलासा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.