Prajakta Shukre elimination : ‘बिग बॉस मराठी’ सिझन ६ मध्ये आता रंगत चालला आहे. काही स्पर्धकांची एक्झिट इथे पाहायला मिळाली तर काही वाईल्ड कार्ड स्पर्धक आले. प्रत्येक दिवशी घरात कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद झाल्याचं पाहायला मिळालं. तर बरेचदा या स्पर्धकांची मैत्रीही पाहायला मिळाली. स्पर्धकांनी ‘बिग बॉस’च्या घरात खेळलेल्या गेमवरुन रितेश देशमुखने भाऊच्या धक्क्यावर त्यांची चांगलीच शाळा घेतली. ‘बिग बॉस’च्या घरात राखी सावंतच्या एंट्रीने जान आली असं म्हणणं वावगं ठरणार नाही. प्रत्येक स्पर्धकाला तिने एक प्रकारे धडा शिकवला. आणि त्यामुळे घरात बराच राडा झालेला पाहायला मिळाला. ‘बिग बॉस’च्या या सीझनच्या नवव्या आठवड्यात कोणता स्पर्धक घराबाहेर पडणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या असताना सोशल मीडियावर प्राजक्ता शुक्रेचं नाव घेतलं जातं आहे.
प्राजक्ताचा बिग बॉसमध्ये गेम दिसत नाहीये. हे घरातील सदस्यांना नव्हेच तर प्रेक्षकांनाही दिसून आलं आहे. त्यामुळे आता प्राजक्ता शुक्रे बिग बॉसच्या नवव्या आठवड्यात एलिमिनेट झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू आहेत. करण सोनावणे ‘बिग बॉस’मध्ये असताना प्राजक्ता शुक्रे त्याच्यासोबत गॉसिप करताना दिसायची. त्याचबरोबर करण आणि प्राजक्ता इतर स्पर्धकांना नावंही ठेवायचे. मात्र करणच्या एक्झिटनंतर प्राजक्ता तितकीशी खेळताना दिसली नाही. रितेशनं अनेकदा भाऊच्या धक्क्यावर प्राजक्ताला तिच्या गेमबद्दल समजावलं होतं पण प्राजक्ताने तिच्या गेममध्ये काहीच बदल केला नाही.
आणखी वाचा – नीना गुप्ता वयाच्या 66 व्या वर्षी गरोदर? विजय- रश्मिकाच्या रिसेप्शनमध्ये बेबी बंपची चर्चा

बिग बॉस मराठी ६च्या आठव्या आठवड्यापर्यंत राधा मुंबईकर, दिव्या शिंदे, ओमकार राऊत, सोनाली राऊत, आयुष संजीव, करण सोनावणे, सचिन कुमावत, रोशन भजनकर आणि रुचिता जामदार हे स्पर्धक एलिमिनेट झाले. त्यामुळे आता सोशल मीडियावर होणाऱ्या चर्चांनुसार प्राजक्ता शुक्रे खरंच एलिमिनेट होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.





