Tharla Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, सायली व अर्जुन यांच्यात प्रेमाचे बंध फुलताना पाहायला मिळतात. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले असल्याचे पाहायला मिळतंय. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, सायली व अर्जुन यांचा वाढदिवस असतो. त्यानिमित्त सगळ्यांना तयारी करायची असते, म्हणून कुसुम सायलीला तिच्या खोलीत घेऊन जात असते. तर चैतन्य अर्जुनला घेऊन जात असतो. मात्र, दोघेही जायला नकार देतात. तेव्हा कुसुम सायलीला जबरदस्ती तिच्या रूममध्ये घेऊन जाते. चैतन्य व अर्जुनही निघून जातात. त्यानंतर सगळेचजण तयारी करत असतात. कुसुम सायलीला म्हणते की, मधु भाऊ किती खुश आहेत. तुमचा संसार पाहण्यासाठी ते खूप व्याकुळ आहेत आणि तुमचा हा खोटा संसार आहे हे त्यांना समजलं तर त्यांना खूप मोठा धक्का बसेल.
यावर सायली सांगते की, आता हा खोटा संसारच खरा होणार आहे. कारण मधु भाऊ सुटायचीच आम्ही वाट पाहत होतो. आता आम्ही लवकरच एकत्र येऊ. यावर कुसुम अर्जुनला मठ्ठ असं म्हणते आणि म्हणते की त्याला काही कळतच नाहीये. यावर सायलीला फार वाईट वाटतं. त्यानंतर कुसुम सायलीला प्रेमाचे सल्ले देताना दिसते. मात्र, सायली अर्जुनच्या आठवणींमध्ये रमून जाते आणि तिचं लक्ष नसतं. तर इकडे चैतन्य सुद्धा अर्जुनला प्रेमाचे धडे देताना दिसतोय. मात्र, अर्जुन कानात हेडफोन घालून रोमँटिक गाणी ऐकताना दिसत आहे. त्यामुळे त्याचं सुद्धा चैतन्यच्या बोलण्याकडे लक्ष नसतं.
अर्जुन, चैतन्यला ज्वेलरी शॉपमध्ये घेऊन जातो. सायली, एका कॅफेमध्ये अर्जुनसाठी टेबल बुक करते. अर्जुन, सायलीला प्रपोज करण्यासाठी डायमंड रिंग घेतो. सायली मध्येच गाणी गुणगुणत असते. सायली, अर्जुनसमोर तिच्या भावना व्यक्त करण्याचा विचार करते. प्रताप व चैतन्य, मधुभाऊंच्या खोलीत जातात. ते मधुभाऊंना, सायलीकडून फोटो आणायला सांगतात. मधुभाऊ सायलीकडे जातात. उद्याचा दिवस तुला त्रासाचा जातो ना? असं मधुभाऊ सायलीला विचारतात. त्यावर सायली म्हणते, आता मी बरीये.
सायली, मधुभाऊंना लग्नाचे व इतर फोटो दाखवते. त्यामध्ये सायलीचा लहानपणीचा म्हणजेच खऱ्या तन्वीचा फोटो असतो. तो फोटो ते बघणार इतक्यात तिथे अर्जुन येतो आणि मधुभाऊ अल्बम घेऊन जातात. सायली-अर्जुन एकमेकांकडे बघून लाजतात. आता सायली व अर्जुन एकमेकांवरील प्रेमाची कबुली केव्हा देणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.