राज्यात नव्या सरकारचा शपथविधी सोहळा नुकताच पार पडला. या शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेते, कलाकार आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५.३० वाजता मुंबईतील आझाद मैदानात हा भव्य शपथविधी सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमत्रीपदाची शपथ घेतली होती. (Marathi artists wish Chief Minister Devendra Fadnavis and Deputy Chief Ministers Ajit Pawar and Eknath Shinde)
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी सोहळ्यात बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, सलमान खान आणि संजय दत्तसह अनेक बॉलिवूड स्टार्स दिसले. रणवीर सिंग, रणबीर कपूर, माधुरी दीक्षित, संजय दत्त, विद्या बालन यांसारखे कलाकार या शपथविधी सोहळ्यात उपस्थित होते. त्याचबरोबर काही मराठी कलाकारांनीही या सोहळ्याला हजेरी लावली होती. एकूणच देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेताच राज्यात जल्लोष साजरा केला जात आहे.

काही मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत सुद्धा नवनिर्वाचित मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने “अविस्मरणीय क्षण” असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा शपथ घेतानाच व्हिडीओ शेअर केला आहे. तर अभिनेत्री मेघा धाडेनेदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो व व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत.
आणखी वाचा – Video : नवऱ्याचं यश पाहून मुग्धा वैशंपायनचा आनंद गगनात मावेना, प्रथमेशचा व्हिडीओही केला शेअर
त्याचबरोबर गायक मंगेश बोरगावकरने इन्स्टाग्राम स्टोरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो पोस्ट करत “आपल्या महाराष्ट्राला लाभलेले गतवैभव पुढील काळात पुन्हा एकदा प्राप्त होवो, हीच नागरिक म्हणून मनापासून इच्छा” असं म्हटलं आहे. तर ‘सारगेमप लिटिल चॅम्प्स’ फेम गायिका मुग्धा वैशंपायनने देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत मनःपूर्वक अभिनंदन मा. देवेंद्रजी” असं म्हटलं आहे