Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू व आदित्य यांना पुरस्कार मिळालेला असतो. मात्र मारुती आदित्यबरोबर पारूला पुरस्कार घेण्यास जाण्यास नकार देतो. आणि कुठे जायचं नाही असे सांगतो. ही गोष्ट जेव्हा आदित्यला समजते तेव्हा तो फार अस्वस्थ होतो. पारू आपल्याबरोबर येत नाहीये ही गोष्ट त्याला पटत नाही. शेवटी तो मारुतीजवळ जातो आणि त्याला जाब विचारतो आणि म्हणतो की, पारूला तुम्ही का पाठवत नाही आहात. आज तिच्या आयुष्यातील हा खूप महत्त्वाचा क्षण आहे आणि तो तिनं स्वतः एन्जॉय केला पाहिजे. आदित्य मारुतीकडे जाऊन आलेला अनुष्काला पटत नाही. त्यामुळे अनुष्का आदित्यशी बोलायचं ठरवते आणि ती सरळ सरळ म्हणते की, पारू आणि तुझं असं काय नातं आहे.
तू पारू बाबतीत इतका इमोशनल का आहेस?, यावर आदित्य सांगतो की, पारू आणि तुझी तुलना होऊ शकत नाही. पारू ही गावाकडून आलेली साधी सर्वसामान्य आणि या घरात नोकर म्हणून काम करणारी मुलगी आहे. तर तू एक पॅशनेट, बिजनेस करणारी आणि स्वतंत्र अशी मुलगी आहेस. तुमची तुलना होऊ शकत नाही. आणि हे सगळं काही पारू ऐकते. तेव्हा आदित्य पारू बद्दल जे काही बोलला ते ऐकून पारूला फार वाईट वाटतं. तर अनुष्का मुद्दाम आदित्यला घट्ट अशी मिठी मारते आणि निघून जाते. त्यानंतर इकडे अहिल्यादेवी व श्रीकांत बोलत असतात.
तेव्हा अहिल्यादेवी सांगते की, या वेळेला पुरस्कार घ्यायला जाताना मी जायचं नाही ठरवलंय. काही वेळा मुलांना त्यांचं आयुष्य त्यांच्या परीने जगणं गरजेचं आहे आणि आता आदित्यची बायको हा पुरस्कार सोहळा मिरवेल. आई म्हणून मी नेहमी त्याच्या पाठीशी असेलच पण या वेळेला पुरस्कार स्वीकारताना आदित्यची बायको त्याच्याबरोबरच असणं खूप महत्त्वाचं आहे. यावर श्रीकांत अहिल्यादेवींचं कौतुक करतो. तर पारू तिच्या घरासमोर बसलेली असते तेव्हा सावित्री येते. सावित्री पारूला विचारते, तुझं काय झालं आहे?, तुला कोणी काही बोलले का?, तू इतकी चिडचिड का करत आहेस?.
यावर पारू सांगते की, आदित्य सरांना असं वाटतंय की, मी या घरात नोकर म्हणून आले आहे. माझी जागा नोकर म्हणूनच आहे. हे सगळं ऐकल्यावर सावित्रीलाही वाईट वाटतं. सावित्री पारूला समजावण्याचा प्रयत्न करते, मात्र पारू समजून घेत नाही. आता मालिकेच्या पुढील भागात आदित्यला खऱ्या अर्थाने पारूच्या प्रेमाची जाणीव होणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.