Tharla Tar Mag Marathi Serial : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, इकडे अर्जुन सायलीसाठी पत्र लिहितो. आपल्या मनातल्या भावना सायलीला सांगाव्यात अशी अर्जुनची मनोमनी इच्छा असते. त्यामुळे लव लेटर लिहून सायलीला देण्याचा त्याचा प्रयत्न सुरु असतो आणि चैतन्य त्याला यात मदत करत असतो. चैतन्यच्या सांगण्यानुसार अर्जुन लव लेटर लिहितो आणि ते लव लेटर तो डायनिंग टेबलवर ठेवतो, जेणेकरुन ते सायलीच्या नजरेस पडेल. त्यानंतर तो सायलीच्या आजूबाजूला घुटमळत असतो. हे पाहून सगळेजण सायलीच्या मागे मागे करतो, असं म्हणत अर्जुनला डिवचतात. त्यामुळे शरमेने अर्जुन बाजूला होतो.
चैतन्य व अर्जुन बाजूला जाऊन पाहत असतात की, सायली ती चिट्टी उचलते का. सायली ती चिट्ठी उचलते तर गेल्या महिन्याची यादी असल्याने सायली ती यादी घेते आणि फाडून फेकून देते. तेव्हा अर्जुनचा हिरमोड होतो. अर्जुनला फार वाईट वाटतं की, सायलीने आपण दिलेली चिठ्ठी फाडून फेकून दिली आहे. त्यामुळे दोघांमध्ये खूप मोठा गैरसमज होतो. तर, इकडे प्रिया व अस्मिता बोलत असतात. हा सगळा डाव प्रिया व अस्मिताचा असतो कारण प्रियाने चैतन्य व अर्जुनला लव लेटरबद्दल बोलताना ऐकलेलं असतं.
तो लव लेटर ठेवणार हे प्रियाला नक्कीच माहीत असतं त्यामुळे प्रिया सुद्धा त्यांच्या पाठीमागेच असते. अर्जुन व चैतन्य बाजूला होतात तेव्हा प्रिया पटकन वाण सामानाची यादी त्या चिठ्ठीच्या जागी ठेवते आणि प्रियाचा हा प्लॅन यशस्वी होतो. तर इकडे सायलीने चिठ्ठी फाडून फेकून दिल्याने अर्जुन खूपच नाराज झालेला असतो. तर प्रतिमा सुद्धा तिच्या घरी परत जायला निघालेली असते तेव्हा पूर्णा आजींना भरुन येतं.
आणखी वाचा – करण जोहरचा स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, “मी सिंगल आहे पण…”
पूर्णा आजी प्रतिमाला राहायला सांगतात, मात्र प्रतिमा सांगते की, आता मला जावं लागेल. माझ्याकडे फोन आहे आपण फोनवर व्हिडीओ कॉलिंगद्वारे एकमेकींना पाहू शकतो असं म्हणून ती सुभेदारांचा निरोप घेते.