बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर हा त्याच्या चित्रपटांबरोबरच अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत येताना दिसतो. तो अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यावर खुलेपणाने बोलताना दिसतो. याआधीही त्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे केले आहेत. अशातच त्याने नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट केली ज्यानंतर तो पुन्हा एकदा चर्चेत आला. खरंतर करण जोहरने एका पोस्टद्वारे त्याच्या रिलेशनशिप स्टेटसचा खुलासा केला आहे.
करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरी मध्ये असं लिहिले होते की, “मी सध्या इतका सिंगल आहे की, एका खडकावर उभा राहून ओरडलो की मी तुझ्यावर प्रेम करतो आणि माझ्या प्रतिध्वनीने मला फक्त मित्र बनायचे आहे असे उत्तर दिले”. करण जोहरने त्याच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल बोलण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी फेय डिसूझाबरोबरच्या संभाषणात करणने खुलासा केला होता की तो वयाच्या ४० व्या वर्षापर्यंत जोडीदाराच्या शोधात होता.
आणखी वाचा – चारुलता व चारुहासचे लग्न थांबवण्यासाठी अक्षराने लढवली अनोखी शक्कल, वेश बदलून रुग्णालयातून पळाली अन्…
सिंगल लाइफ एन्जॉय करत असलेला करण जोहर तेव्हा म्हणाला होता की, “मी माझ्या सिंगल लाइफचा किती आनंद घेत आहे हे मी सांगू शकत नाही. मला वाटत नाही की, मी आता बाथरूम किंवा बेडरूम किंवा किंवा शेड्यूल शेअर करणे विसरून जाईन आणि स्वतःला बदलू शकेन. मला वाटतं तुमच्या दिवसाची ताकद तुमच्याबरोबर आहे, तुमची जबाबदारी तुमच्या मुलांसाठी आणि तुमच्या आईसाठी आहे, एवढेच…”
यापुढे तो म्हणाला की, “मी ४० वर्षांचा झालो तेव्हा मला एकटं एकटं जाणवलं, पण जेव्हा मी ५० वर्षांचा झालो तेव्हा मला असे वाटले की मला ते नको होते. मी ब्लाइंड डेट परिस्थितीतून गेलो आहे आणि देशातील आणि देशाबाहेर लोकांना भेटलो आहे. आता ते चांगले वाटले तर मला त्याची अजिबात गरज वाटत नाही”.