जुने चित्रपट पुन्हा प्रदर्शित होण्याचा ट्रेंड सध्या वाढत आहे. अलीकडेच प्रदर्शित झालेल्या ‘वीर-झारा’, ‘कल हो ना हो’ या कलाकृतींना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद आहे. याच पार्श्वभूमीवर राकेश रोशन दिग्दर्शित आणि ज्येष्ठ कलाकार राखी, अमरिश पुरी, तसंच शाहरुख खान, सलमान खान, काजोल, ममता कुलकर्णी यांच्या भूमिका असलेला ‘करण-अर्जुन’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला आहे. नव्वदच्या दशकात प्रदर्शित झालेल्या ‘करण-अर्जुन’ या चित्रपटातले संवाद व गाणी गाजली. चित्रपट प्रदर्शित होऊन आता ३० वर्षे झाली आहेत आणि पुन्हा प्रदर्शित झाल्याने तो चाहत्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहे. (Mamta Kulkarni Missing)
या चित्रपटात दिसणारे मुख्य कलाकार आजही सिनेसृष्टीत कार्यरत आहेत. पण अभिनेते अमरीश पुरी यांचे २००५ मध्ये निधन झाले आणि अभिनेत्री ममता कुलकर्णी २००२ पासून बॉलिवूडमधून गायब आहे. ममताचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट ‘कभी तुम कभी हम’ होता. म्हणजे ममता इंडस्ट्रीतून गायब होऊन जवळपास २२ वर्षे उलटून गेली आहेत. अलीकडेच चित्रपटाच्या ३० व्या वर्धापन दिनाच्या सेलिब्रेशनला ‘फिल्म बीट’शी झालेल्या संभाषणात राकेश रोशन यांनी अमरीश पुरीची आठवण येत असल्याचे सांगितले.
आणखी वाचा – करण जोहरचा स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल खुलासा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, “मी सिंगल आहे पण…”
यावेळी राकेश रोशन म्हणाले की, “पुरी यांना या सोहळ्याचा भाग बनून खूप आनंद झाला असता. परंतु दुर्दैवाने ते आता आमच्यात नाहीत”. यावेळी राकेश रोशन यांना ममता कुलकर्णीबद्दल विचारले असता, ते म्हणाले की, “कदाचित तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्याची माहिती मिळाली असावी. पण मी आता तिच्या संपर्कात नाही आणि ती आता कुठे आहे हेही मला माहीत नाही”.
अभिनेत्री ममता कुलकर्णी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, एक काळ असा होता जेव्हा ममता प्रसिद्ध अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी होती. दाऊदच्या शुटरसोबत असलेल्या नात्यामुळे अभिनेत्रीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं. ‘आशिक आवारा’, ‘क्रांतिवीर’, ‘वक़्त हमारा है’, ‘करण अर्जुन’ आणि ‘चाइना गेट’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्रूी झळकली. पण गेला अनेक काळ ती सिनेसृष्टीपासून लांब आहे.