Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू आदित्यला गेट जवळच थांबवून जाब विचारते, “तुम्ही अनुष्काला का भेटायला गेला होता. देवी आईंना हे आवडलेलं नाहीये. हे तुम्हाला माहीत असताना सुद्धा तुम्ही तिला भेटायला गेलेलात”. यावर आदित्य पारुला उत्तर देत म्हणतो की, ‘पण मी आईचीच बाजू मांडायला गेलो होतो’. यावर पारू सांगते, ‘पण देवी आईंना फार वाईट वाटलं आहे’. यावर आदित्य सांगतो की, ‘तू त्याची काळजी करु नकोस. मी आईची समजूत घालेल’. त्यानंतर तो घरात जातो आणि अहिल्यादेवींना भेटायला जातो. तर अहिल्यादेवी श्रीकांतला सांगतात की, ‘मला आदित्यशी आता काहीच बोलायचं नाहीये. त्यामुळे तू मी झोपली आहे असं सांग’.
श्रीकांतही बाहेर येऊन आदित्यला अहिल्या झोपली असल्याचे सांगतो. तिचं थोडं डोकं दुखत आहे त्यामुळे ती झोपली असल्याचं तो आदित्यला सांगतो. दुसऱ्या दिवशी सगळेजण डायनिंग टेबलवर जमलेले असतात. तेव्हा आदित्य अहिल्यादेवींशी बोलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्या काहीच बोलत नाही. तेव्हा आदित्य अहिल्यादेवींची माफी मागतो. त्याच वेळेला तिथे अनुष्का येथे आणि अनुष्का सांगते की, ‘तो मलाच भेटायला आला होता पण माझ्याकडे येऊन त्यानं तुमची बाजू मांडली. तुम्ही कशा चूक नाही आहात, तुम्ही बरोबर आहात हे त्याने मला पटवून दिलं आणि मला सुद्धा आदित्यचं बोलणं पटलंय.
आणखी वाचा – करण जोहरने स्वतःच्या रिलेशनशिपबद्दल केला खुलासा, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाला, “इतका सिंगल आहे की…”
आदित्यची आई कधी चुकू शकत नाही हे त्याने मला उत्तमरित्या पटवून दिलं आणि म्हणूनच मी तुमची माफी मागायला आले आहे. मी माझा शब्द मागे घेते त्यामुळे मला माफ करा’, असं म्हणत अनुष्का सगळ्यांसमोर अहिल्यादेवींची माफी मागते. यावर अहिल्यादेवी ही खुश होतात आणि सांगतात की, ‘मला माहित होतं तू माझी माफी मागशील. मी तुझी परीक्षा बघत होते कारण तू मला आवडलीस. ज्या दिवशी मी तुला पाहिलं त्या दिवशी तुझा करारीपणा, धीटपणा मला भावला आणि तू मला आवडू लागलीस. त्यामुळे तू जे वागतेस ते खरं वागतेस का याची एक परीक्षा म्हणून मी हे वागले. तुझं घर तुझा बिजनेस सगळं काही तुझ्या जवळच आहे’. यावर अनुष्काही अहिल्यादेवींचे आभार मानत म्हणते की, ‘माझे शेअर्सही डबल झाले आहेत. किर्लोस्कर कंपनी माझ्या कंपनीमध्ये इंटरेस्टेड आहे. हे कळताच माझ्या कंपनीचे शेअर वाढले शिवाय माझं घर, कंपनी सगळ्याच गोष्टी माझ्या हातात आहेत. इतकंच नाही तर बँकही मला हवं तितकं लोन देण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं आहे.
आणखी वाचा – चारुलता व चारुहासचे लग्न थांबवण्यासाठी अक्षराने लढवली अनोखी शक्कल, वेश बदलून रुग्णालयातून पळाली अन्…
अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या एका शब्दावर या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आणि माझं काहीच नुकसान झालेलं नाही उलट माझा फायदाच झालेला आहे’. त्यानंतर अनुष्का अहिल्यादेवी जवळ येते आणि सांगते की, ‘आज माझी आई असती तर ती तुमच्यासारखीच असती असं मला वाटतं. माझी आई मला फारशी आठवत नाहीये पण तुमच्याकडे बघून मला माझ्या आईची कमतरता भासत नाहीये’. आता मालिकेच्या पुढील भागात काय होणार हे पाहणं रंजक ठरेल.