‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेने अल्पवधीतच सगळ्यांची मनं जिंकून घेतली. कमी कलावधीतच या मालिकेने टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थान निर्माण केलं. मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं आहे. मालिकेतील अर्जुन सुभेदारच्या भूमिकेत दिसणारा अभिनेता अमित भानुशालीने त्याच्या अभिनयातून सगळ्यांनाच आपलंस केलं. त्याचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. अमित सोशल मीडियावर बराच सक्रिय असतो. तो नेहमी त्याच्या कामाव्यतिरिक्त त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील क्षण सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्यातही तो त्याच्या लेकाबरोबरचे व्हिडीओही शेअर करताना दिसतो. (Arjun son hridaan make chapatti video viral)
या शेअर केलेल्या व्हिडीओतून अमित व त्याच्या लेकाचं सुंदर बॉण्डिंग पाहायला मिळतं. याअगोदरही त्याने त्याच्या लेकाबरोबरचे व्हिडीओ शेअर केले होते. त्याच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रेमाचा वर्षाव केला होता. आताही अमितने त्याच्या मुलाचा आणखी एक गोड व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ज्यात तो पुन्हा पोळपाट व लाटणं घेऊन बसलेला दिसत आहे.
या व्हिडीओत अमितचा लेक हृदान आजीबरोबर म्हणजे अमितच्या आईबरोबर पोळपाट लाटणं घेऊन बसलेला दिसत आहे. तो त्याच्या इवल्याश्या हातांनी पिठाच्या गोळ्याची चपाती लाटताना दिसत आहे. हृदानने अगदी गोल वर्तुळाकार चपाती लाटली आहे. त्याचा हा व्हिडीओ स्टोरीला पोस्ट करत अमितने त्याच्या लेकाचं कौतुक केलं आहे. अमित लिहितो की, “आतापासूनच इतकी परफेक्ट चपाती! आजीबरोबर चपाती बनवताना शेफ हृदान”, असं लिहीत त्याने त्याच्या मुलाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे.
त्याने मागेही हृदानचा पोळपाट-लाटणं घेऊन चपात्या लाटतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केसा होता. तेव्हा त्याने या व्हिडीओला “मास्टरशेफ” असं कॅप्शन देत लेकाचं कौतुक केलं होतं. त्याच्या चाहत्यांनी देखील त्याचं भरभरुन कौतुक केलं होतं. नेटकऱ्यांनाही त्याच्या लेकाच्या करामती पाहायला आवडतात. अमितही त्याच्या लेकाचे विविध व्हिडीओ शेअर करत असतो.