‘ठरलं तर मग’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. जुई या मालिकेमुळे सध्या बरीच चर्चेत आहे. छोट्या पडद्यावरील या मालिकेला प्रेक्षकांकडूनही भरभरुन प्रेम मिळत आहे. मालिकेत जुईने सायली हे प्रमुख पात्र साकारलं आहे. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. तिच्या आयुष्यातील चालू घडामोडींचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकताच तिने शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर बराच पसंतीस पडत आहे. ( jui gadkari shared special video)
नुकताच तिने तिच्या आजीच्या आठवणीत एक खास पदार्थ बनवला. तो पदार्थ बनवतानाचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तो पदार्थ बनवताना तिने आजीच्या आठवणी सांगितल्या आहेत. तो खास पदार्थ म्हणजे चिवडा. तिची आजी तिच्यासाठी कसा चिवडा बनवायची या मागच्या आठवणी त्याने या पोस्टमधून शेअर केला आहे. तिने चिवडा बनवताना संपूर्ण व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
या व्हिडिओला ती कॅप्शन देत म्हणाली, ‘आजीची आठवण आली की, तिच्या हातचे पदार्थ आठवतात. कर्जतला जेव्हा पहिला पाऊस पडायचा तेव्हा आजी आम्हा भावंडांना गरम गरम चिवडा लगेच बनवून द्यायची. तिच्या हातची चव याला नक्की नाही. परवा खूप पाऊस झाला. तेव्हा मला तिची खूप आठवण येत होती. म्हणून तिच्या आठवणीत मी हा चिवडा बनवला. तुम्ही पण नक्की ट्राय करा’, असं म्हणत तिने आजीच्या आठवणींना उजाळा दिला.
जुईने शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत तिचं कौतुक केलं आहे. एका नेटकऱ्याने, ‘मी नोकरीला जायचे तेव्हा माझी आई मला बनवून द्यायची. आता मी माझ्या मुलांना संध्याकाळच्या नाष्ट्याला बनवून देते’, असं म्हणत नेटकऱ्याने स्वतःच्या आठवणींना उजाळा दिला. तर दुसऱ्या नेटकऱ्याने ‘आजीचा स्पेशल टचची कमतरता आहे पण धन्यवाद तु शेअर केलं त्यासाठी’ असं म्हणत तिच्या व्हिडिओवर कमेंट केला आहे.