मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता भूषण प्रधान अनेक कारणांनी चर्चेत असतो. पण गेल्या काही दिवसांपासून तो त्याच्या चित्रपटांमुळे जास्त चर्चेत आला आहे. अनेक मालिका व चित्रपटांमध्ये दिसलेला भूषण प्रधान पडद्यावर सध्या सक्रिय नाही. मात्र लवकरच तो एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘गेले काही दिवस’ असून ज्याचे दिग्दर्शन महेश मांजेरकर करणार आहे. (Bhushan Pradhan post for Mahesh Manjrekar)
या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक महेश मांजरेकर व भूषण प्रधान एकत्र काम करताना दिसणार आहेत. सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरु असून शूटिंगदरम्यान दोघांमध्ये चांगलं बॉण्डिंग झालं आहे. भूषण नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या सहकलाकाराबाबत भरभरून बोलताना दिसतो. अशातच त्याने दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्याने महेश मांजरेकर यांच्या स्वभावाबद्दल आणि त्यांच्याबरोबर काम केल्याचा अनुभव शेअर केला आहे.
हे देखील वाचा – “अतिशय वाईट चित्रपट…”, नाना पाटेकरांची बॉलिवूडवर सडकून टीका, म्हणाले, “कुवत नसताना…”
भूषणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाच्या शूटिंगमधील काही फोटोज शेअर केले आहे, ज्यामध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर दिसत आहे. हे फोटोज शेअर करत भूषण म्हणतो, “माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एका दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणं, म्हणजे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं आहे. ते या चित्रपटाचे दिग्दर्शन करत नाही, तर माझ्याबरोबर ते स्क्रीन शेअर करत आहे. ज्याची स्क्रिप्ट त्यांच्या खूप हृदयाजवळची आहे, ते या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन करत आहे. खरोखरच हा माझ्यासाठी विलक्षण अनुभव असून या अनुभवातील प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेत आहे.”
हे देखील वाचा – “उपमुख्यमंत्र्यांची पत्नीच हे करु शकते”, न्यूयॉर्कमध्ये गाणं गाण्यावरुन अमृता फडणवीस ट्रोल, नेटकरी म्हणतात, “आता तरी…”
“प्रत्येक दिवशी मी त्यांच्याकडून महत्त्वाचे धडे शिकतोय. ते कठोर आहेत, ते समोरच्या व्यक्तीचं कौतुक करतात, ते खूप खेळकर, प्रेमळ आणि प्रत्येकाची काळजी घेणारेही आहेत.”, असं भूषण प्रधान त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला. त्याच्या या पोस्टवर चाहते लाईक्स व कमेंट्सद्वारे प्रेम देत आहे. त्याचबरोबर या पोस्टवर दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना आगामी चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.