मंगळवार, मे 13, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding  : लेकाच्या लग्नात मुकेश अंबानींची अन्नसेवा, स्वत:च्या हाताने वाढले अन्न, अनंत व राधिकानेही घेतला सहभाग, व्हिडीओ व्हायरल

Saurabh Moreby Saurabh More
मार्च 2, 2024 | 10:29 am
in Trending
Reading Time: 2 mins read
google-news
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

अनंत अंबानी-राधिका मर्चंट प्री वेडिंग सोहळा

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding in Jamnagar : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या घरी सध्या लग्नाची लगबग सुरु आहे. अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाच्या काही दिवस आधी जामनगरध्ये प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन केले गेले आहे. १ ते ३ मार्चपर्यंत या प्री-वेडिंग फंक्शन्सचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच  जामनगरमध्येच अंबानी कुटुंबाच्या वतीने अन्नसेवेचे आयोजन करण्यात आले.

जामनगरमधील रिलायन्स टाउनशिपजवळील जोगवाड गावात ग्रामस्थांसाठी अन्नसेवेचेअययोज करण्यात आले होते. यावेळी तब्बल ५१ हजार स्थानिक लोकांसाठी या अन्नसेवेचे आयोजन करण्यात आले होते. जे पुढील काही दिवस सुरू राहणार आहे. अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या सेलिब्रेशनसाठी अंबानी कुटुंबांनी स्थानिकांचे आशीर्वाद घेतले. तसेच भोजनानंतर उपस्थितांनी पारंपरिक लोकसंगीताचाही आस्वाद घेतला. प्रसिद्ध गुजराती गायक कीर्तिदान गढवी यांनी आपल्या गायनाने उपस्थितांचे मनोरंजन केले.

View this post on Instagram

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

आणखी वाचा – “किती छळत आहेस त्याला”, नवऱ्याचा हात हातात घेऊन उभ्या असलेल्या पूजा सावंतला बहीण असं का म्हणाली?, व्हिडीओही केला शेअर

या अन्नसेवा कार्यक्रमात मुकेश अंबानींनी स्वत:च्या हाताने अन्नदान केले. मुकेश अंबानींनी स्वत:च्या हाताने गोड पदार्थ वाढले. तसेच यावेळी त्यांनी गावकऱ्यांची विचारपुसही केली. यावेळी कुणी राधिका व अनंत यांना आशीर्वाद देताना दिसले, तर कुणी त्यांना भेटवस्तूही दिल्या. दरम्यान, एका व्यक्तीने घरी बनवलेले अन्नही आणले, जे विशेषतः मुकेश अंबानींसाठी होते. तसेच या सोहळ्यात मुकेश अंबानींनी सर्वसामान्यांप्रमाणेच जेवणाचा आस्वाद घेतला. मुकेश अंबानी हाताने खाताना दिसले आणि त्यांनी त्या व्यक्तीच्या जेवणाचे कौतुकही केले. हातात खाद्यपदार्थ घेऊन ते इतर लोकांशी बोलतानाही दिसत होता. त्यांचा अन्नदान करतानाचा हा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

आणखी वाचा – “गावी पोहोचल्यानंतर…”, कित्येक वर्ष कुटुंबियांपासून दूर राहतात ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम श्याम राजपूत, म्हणाले, “छत्रपती संभाजी नगरला…”

या व्हिडीओखाली कमेंट्समध्ये अनेकांनी मुकेश अंबानींच्या या कृतीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर अनेकांनी या संपूर्ण कार्यक्रमासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत. दरम्यान, गेल्यावर्षी १९ जानेवारीला अनंत-राधिकाचा साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. यानंतर वर्षभराने आज त्यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याची चर्चा रंगली आहे. प्री-वेडिंगनंतर येत्या १२ जुलैला या दोघांचा मुंबईत शाही विवाहसोहळा पार पडणार आहे.

Tags: Anant Ambani Wedding News in MarathiAnant Ambani-Radhika Merchant Guest ListAnant Ambani-Radhika Merchant MarriageAnant Ambani-Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in MarathiAnant Ambani-Radhika Merchant Pre Wedding FunctionsAnant Ambani-Radhika Merchant Pre Wedding PhotosAnant Ambani-Radhika Merchant Pre Wedding VideosAnant Ambani-Radhika Merchant Wedding Date in MarathiAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding bashAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding JamnagarAnant Ambani-Radhika Merchant’s pre-wedding Marathi NewsJamnagar Airportmukesh ambaninita ambaniradhika merchantRihannaRihanna in Anant Ambani-Radhika Merchant’s pre-weddingअनंत अंबानी-राधिका मर्चंट गेस्ट लिस्टअनंत अंबानी-राधिका मर्चंट प्री वेडिंग जामनगरअनंत अंबानी-राधिका मर्चंट प्री वेडिंग सेलिब्रेशन अपडेट्सअनंत अंबानी-राधिका मर्चंट प्री वेडिंग सोहळाअनंत अंबानी-राधिका मर्चंट मॅरेजअनंत अंबानी-राधिका मर्चंट लग्नाची तारीखअनंत अंबानी-राधिका मर्चंट लेटेस्ट अपडेटजामनगर विमानतळ
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Ankita Walavalkar On Influencer
Entertainment

“फॉलोवर्सचा आकडा पाहून…”, सूरज चव्हाणचा ‘झापूक झुपुक’ न चालण्यावरुन कोकणहार्टेड गर्लचं भाष्य, म्हणाली, “त्याचे फॅन्स…”

मे 13, 2025 | 7:00 pm
abhijeet sawant on Marathi industry
Entertainment

“मराठी इंडस्ट्रीने कधी आपलसं केलंच नाही”, अभिजीत सावंतचा खुलासा, म्हणाला, “खूप दुखावलो…”

मे 13, 2025 | 6:22 pm
operation sindoor news
Entertainment

“गुटखा, जुगाराची जाहिरात करतात पण…”, कमांडो ऑफिसरचा बॉलिवूड सेलिब्रिटींना सवाल, ऑपरेशन सिंदूरला पाठिंबा न देण्यावरुन…

मे 13, 2025 | 4:56 pm
Swiggy Delivery Boy Viral Video
Social

बाळंतपणात बायको गेली, संसार एकट्यावरच अन्…; लेकीला घेऊन स्विगी डिलिव्हरी करणारा ‘बाप’

मे 13, 2025 | 4:51 pm
Next Post
Anant Ambani and Radhika Merchant Pre Wedding Celebration Updates in Marathi

Anant Ambani-Radhika Merchant Pre Wedding : “अनंत हा नेहमीच…”, लेकाबद्दल बोलताना मुकेश अंबानींना अश्रु अनावर, उपस्थितांचेही डोळे पाणावले अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.