Tharal Tar Mag Serial Update : ‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असे पाहायला मिळणार आहे की, तन्वी सायलीच्या हातातला कॉफीचा कप पकडून ठेवते. तर इकडे सायली अर्जुनला अलिबागचे परिणाम भोगत असल्याचे बोलून दाखवते. तन्वी प्रकरणावरुन सायली अर्जुनला चांगलीच फैलावर घेते. सुमन नागराजला स्वतःच्याच घरात चोरी केल्याबद्दल बोलून दाखवते त्यावेळी सुमनच्या मनात चांगलं दिसण्यासाठी नागराज रडून नाटक सुरु करतो. सुमन नागराजला काही संकट आले आहे का असे विचारताच तो, एक बिझनेस सुरु केला होता पण ऐनवेळी पार्टनर पैसे घेऊन पळून गेल्याने आणि इन्व्हेस्टरकडून धमकी आल्याने नाईलाजाने चोरी करावी लागल्याचे नागराज सुमनला सांगतो आणि सुमनकडून स्वतःच सांत्वन करुन घेतो.
पूर्णा आई प्रतिमासाठी खोलीत फुलं घेऊन येते. आईच्या मायेने तुला फुलं द्यायला आल्याचे प्रतिमाला सांगत पूर्णा आई खोलीत फुलं ठेवून जाते. रविराजला सांगितले असते तर तो खूप ओरडला असता, म्हणून त्याला सांगितले नसल्याचे नागराज सुमनला सांगतो. सुमन इन्व्हेस्टरला पैसे देण्यासाठी स्वतःच्या माहेर हुन पैशाची मदत होईल असा ठाम विश्वास नागराजला देते. दुसरीकडे प्रतिमा पूर्णा आईने ठेवलेल्या फुलांचा सुगंध घेते आणि हे सगळं पूर्णा आई बाहेरुन पाहत असते. हे पाहून पूर्णा आईला अत्यानंद होतो आणि ती घरच्या सगळ्यांना हा घडलेला प्रकार सांगते.
यावरुन तिला सगळे आठवून ती मला पूर्णा आई म्हणेल ना असं विचारते. प्रताप त्यावर पूर्णा आईला हो नक्की आठवेल असं सांगतो. तन्वी मनातल्या मनात प्रतिमाचा आवाज गप्पच राहिला पाहिजे, नाहीतर आपले काही खरं नाही असं मनातल्या मनात म्हणते. सायली अर्जुनसमोर पाणी घेऊन येते आणि सायली तन्वीला घेऊन जाते. अर्जुन पोटात दुखायचे नाटक करतो, सायली लगेच ओव्याचे पाणी घेऊन येण्याबाबत बोलते. अर्जुन तन्वी खोलीत आल्याचं सगळं काही सायलीसमोर खरं बोलून जातो.
हे ऐकून सायली दुःखी होते. मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, अर्जुन रविराजला प्रतिमा आता समोर आहे तर ती डेडबॉडी कुणाची होती आणि त्याचा डीएनए तन्वीशी मॅच कसा झाला याबद्दल विचारतो. तर एकीकडे तन्वी सायलीला अर्जुनला मी जिंकून दाखवेन असं चॅलेंज करते.