Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील दुसरा आठवडा सुरू झाला असून या आठडव्याच्या सुरुवातीलाच घरातील कॅप्टन्सी पदासाठी टास्क होणार आहे आणि या कॅप्टन्सी पदासाठी स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. नुकत्याच आलेल्या नवीन प्रोमोमध्ये ‘बिग बॉस’च्या घरात कॅप्टन पदासाठीची मारामारी पाहायला मिळत आहे. ‘कॅप्टनची बुलेट ट्रेन’ असं या टास्कचं नाव असून या ट्रेनमध्ये कॅप्टन बनण्यासाठीची एक सीट आहे आणि ही सीट जो मिळवेल किंवा या सीटवर जो कुणी बसेल त्याला ‘बिग बॉस’च्या घरातील कॅप्टनचे पद मिळेल असं प्रोमोवरुन कळत आहे. मात्र ‘बिग बॉस’च्या घरातील कॅप्टनचे पद मिळवण्यासाठी स्पर्धकांमष्ये खूपच रेटारेटी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Bigg Boss Marathi 5 Suraj and Vaibhav fight)
या कॅप्टन्सी पदासाठी घरातील सदस्य एकमेकांना भिडणार आहेत, कॅप्टन्सीची सीट मिळवण्यासाठी या घरातील स्पर्धक एकमेकांवर धावून जाणार आहेत आणि यात स्पर्धक एकमेकांना भिडणार आहेत. यात सूरज व वैभव यांच्यात तिफआण राडा होणार आहे. सीट मिळवण्यासाठी सूरज व वैभव एकमेकांसमोर आले असून यामुळे त्यांच्यात जोरदार वाद होणार आहेत. यावेळी सूरज वैभवची सीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतो. तेव्हा वैभव त्याला “बुक्कीत टेंगूळ नाही, मग मी बुक्कीत मुंडी छाटेन” असं म्हणतो.
पुढे वैभव त्याला “तू मला फक्त हात तर लावून बघ” असं वारंवार म्हणतो. यावर सूरजही वैभवला “हात लावल्यावर काय करशील” असं म्हणतो. त्यावर वैभव पुन्हा त्याला “तू हात लावून तर बघ” असं म्हणतो. मग सूरज वैभवला पुन्हा “मी माझा इंगा दाखवेन तुला” असं म्हणतो. यावर वैभव “त्याला तू खूप मस्तीला आलाय का” असं त्वेषाने म्हणतो. सीट मिळवण्यासाठी त्यांच्यात खूपच बाचाबाची होते. त्यांच्यातील हे वाद विकोपाला जाऊ नये, म्हणून इरीना सुरजला अडवण्याचा प्रयत्न करते.
इरीना सूरजला वारंवार “सूरज तू शांत हो, सुरज तू शांत हो” असं म्हणते. वैभव-सूरजच्या वादात इरीना सूरजला लांब घेऊन जाते आणि त्याला शांत व्हायला सांगते. त्यामुळे आता या कॅप्टन्सी टास्कमध्ये कोण कुणावर भारी पडणार? किनाला कॅप्टन्सी पदाची सीट मिळणार आणि कोण या घराचा पहिलं कॅप्टन होणार हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.