Bigg Boss Marathi 5 update : ‘बिग बॉस’च्या घरात ‘कॅप्टन’ला खूप महत्त्व आहे. ‘बिग बॉस’च्या घरात तो खूप महत्त्वाची भूमिका निभवतो. मात्र ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात गेल्या आठडव्यात कुणीही स्पर्धक कॅप्टन बनला नव्हता. नियम मोडल्यामुळे ‘बिग बॉस’ ने शिक्षा दिली होती आणि त्यांनी दिलेल्या शिक्षेमुळे पहिल्या आठवड्यात कुणीही कॅप्टन बनलं नव्हतं. मात्र ‘बिग बॉस’च्या घरातील दुसरा आठवडा सुरू झाला असून या आठडव्याच्या सुरुवातीलाच घरातील कॅप्टन्सी पदासाठी टास्क होणार आहे आणि या कॅप्टन्सी पदासाठीच्या टास्कचा एक नवीन प्रोमो भेटीला आला आहे. (Bigg Boss Marathi 5 first captaincy)
कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे ज्यात कॅप्टन पदासाठीची मारामारी पाहायला मिळत आहे. ‘कॅप्टनची बुलेट ट्रेन’ असं या टास्कचं नाव असून या ट्रेनमध्ये कॅप्टन बनण्यासाठीची एक सीट आहे आणि ही सीट जो मिळवेल किंवा या सीटवर जो कुणी बसेल त्याला ‘बिग बॉस’च्या घरातील कॅप्टन पद मिळेल असं या प्रोमोवरुन कळत आहे. मात्र ‘बिग बॉस’च्या घरातील कॅप्टनचे पद मिळवण्यासाठी स्पर्धकांमध्ये खूपच रेटारेटी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
या प्रोमोमध्ये अरबाज व अभिजीत यांच्यात सीट मिळवण्यासाठी रेटारेटी होत असून अंकिता “बिग बॉस मला hurt (दुःख) होत आहे” असं म्हणताना दिसत आहे. तसंच अरबाज हा खूपच आक्रमक होत असल्याचे या प्रोमोमधून पाहायला मिळत आहे. आक्रमक होताना तो “आता तुम्ही सगळे बघणार की, मी इथे कुणाला बसू देणार नाही.” त्यानंतर इरिना व सूरजदेखील खूप आक्रमक झाल्याचं या नवीन प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.
त्यामुळे आता या कॅप्टन्सीच्या पदासाठीच्या लढतीत कोणता स्पर्धक बाजी मारणार? आणि कोण या घराचा पहिला कॅप्टन होणार? त्याच्याशिवाय या कॅप्टन्सी पदासाठीच्या लढतीत कोण कुणावर भारी पडणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे.