Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अखेर अहिल्यादेवींनी भिक्षा व्रत पूर्ण केलेलं असतं तर पारूनेही निर्जळी उपवास धरुन तिचं व्रत पूर्ण केलेलं असतं. अहिल्यादेवी व पारू दोघीही त्यांच व्रत पूर्ण करुन आदित्यसाठी हॉस्पिटलमध्ये येतात. तेव्हा अहिल्यादेवींनी आणलेला प्रसाद त्या घेऊन आलेल्या असतात तर पारू इकडे तिच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन येते आणि आदित्यच्या हाताला लावून ते मंगळसूत्र गळ्यात घालते तर अहिल्यादेवी भिक्षा मागून बनवलेलं अन्न त्या आदित्यच्या तोंडात टाकतात. त्यावेळेला आदित्यला ठसका लागतो. डॉक्टर सांगतात की, हॉस्पिटलला आल्यानंतर पहिल्यांदाच आदित्यने प्रतिसाद दिला आहे त्यामुळे काही वेळातच आपण ऑपरेशनची तयारी करायला घेऊया.
तुमची देवावरची श्रद्धा कामी आली. हे ऐकल्यावर सगळेच खुश होतात. कालांतराने मालिकेत आदित्य बरा होताना दाखवला आहे. घरी आणल्यानंतर अहिल्यादेवी सावित्री, पारू, आदित्यची काळजी घेताना दिसतात. तर डॉक्टरही येऊन आदित्यला व्यायामाचे प्रकार शिकवत त्याच्याकडून करुन घेताना दिसतात. एकूणच आदित्य ठणठणीत बरा होताना दिसत आहे. तर इकडे सगळेजण किचनमध्ये तयारी करत असतात, तेव्हा अहिल्यादेवी किचनमध्ये येतात आणि सावित्रीला सांगतात की, तुम्ही सगळ्यांनी घरावर आलेल्या संकटाच्या वेळी एकही दिवस सुट्टी घेतली नाही त्यामुळे आता तुम्ही सुट्टी घ्या. मी तुम्हाला सगळ्यांना सुट्टी देत आहे, असं सांगून त्या त्यांना जायला सांगतात आणि स्वयंपाकाचे टेन्शन घेऊ नका मी स्वयंपाक करेन असेही सांगतात.
त्यानंतर तिथे दिशा व दामिनीसुद्धा येतात. हे ऐकून दामिनीला तर घामच फुटतो. दामिनी म्हणते की, आता तुम्ही स्वयंपाक करणार आहात का?, यावर अहिल्यादेवी सांगतात की, हो पण आज आपल्याकडे खास पाहुणे येणार आहेत आणि आपण त्यांच्यासाठी स्वयंपाक करतोय. हे ऐकल्यावर तर दामिनीला अजूनच घाम फुटतो त्यावेळेला अहिल्या देवी सांगतात की, तू काही काळजी करु नकोस. तू काम नाही केलं तरी चालेल. तू दिशा बरोबर जाऊन त्या पाहुण्यांसाठी खास गिफ्ट घेऊन ये. हे ऐकल्यावर त्या दोघीही खूप खुश होतात कारण त्यांच्यावर अहिल्या देवीने काहीतरी जबाबदारी सोपवलेली असते. त्याच वेळेला तिथे पारू येते. पारू अहिल्यादेवींना काम करताना पाहून सांगते की, मी सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे. यावर अहिल्या देवी सांगतात, तू काही ऐकायची नाही, असं म्हणत्य दोघेही कामाला लागतात. त्यानंतर इकडे दिशा व दामिनी अहिल्यादेवीने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली म्हणून खूपच खुश असतात.
दिशा दामिनीला महागडे गिफ्ट घ्यायला घेऊन जाते तर इकडे पारू व अहिल्यादेवी काम करत असतात. त्यावेळी आदित्य पारू जवळ आल्याचा तिला भास होतो आणि तो तिच्याशी बोलतो असं तिला वाटतं. हे लग्नाचं सत्य आदित्यला माहीत असून त्यानं पारूचं त्याच्यावर प्रेम असल्याचेही ऐकलं असल्याचा सांगतो. मात्र तितक्यातच अहिल्यादेवी पारुला आवाज देतात तेव्हा पारुला जाग येते. तर इकडे दिशा व दामिनींने आणलेले गिफ्ट पाहून प्रितमही त्यांच कौतुक करत सांगतो, तुम्ही खूपच छान गिफ्ट आणले आहेत. फक्त ते गिफ्ट तुम्ही चांगल्या मनाने पाहुण्यांना द्या म्हणजे झालं. आता मालिकेत हे खास पाहुणे नेमके कोण असणार हे पाहणं रंजक ठरेल.