‘ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळत आहे की, इकडे सायली अर्जुनशी बोलत असते की कल्पना आपल्याकडून बाळाची अपेक्षा करत आहे हे सगळं काही सायलीला अर्जुनला सांगायचं असतं. तर सायली सांगते की, आई आपल्या दोघांबद्दल… एवढेच बोलून ती शांत होते. तेव्हा अर्जुन तिकडून विचारतो आपल्या दोघांबद्दल काय बोलत होती आई. मात्र सायली काहीच बोलत नाही तेव्हा अजूनच निष्कर्ष काढत म्हणतो की, आईला आपल्या दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजबद्दल कळलं आहे का?, आईला आपल्या कॉन्टॅक्ट मॅरेज बद्दल कसं कळलं?, असा प्रश्न तो सायलीला विचारतो यावर सायली त्याला थांबवायला जाते. (Tharal Tar Mag Serial Update)
इतक्यात कल्पना येते त्यानंतर इकडे प्रिया खोटं खोटं नाटक करत असते की, तिला स्वप्नात तिची आई दिसली. हे नाटक करुन तिला नागराज व प्रियाने आणलेली डेड बॉडी रविराज समोर आणायची असते. त्यामुळे तिचं हे नाटक सुरु असतं. मुद्दाम तोंडाला पाणी लावून ती घाम आल्याचं नाटक करत धावत धावत रविराजकडे जाते आणि सांगते की, बाबा मला वाईट स्वप्न पडलं. यावर रविराज विचारतो, काय पाहिलस तू स्वप्नात. तेव्हा ती सांगते की, आई निश्चिंत पडलेली होती तिचा श्वास थांबलेला होता आणि आपण आजूबाजूला बसून रडत होतो हे चित्र मी स्वप्नात पाहिले. हे ऐकल्यावर रविराज तिला थांबवतो आणि सांगतो की, असं काही होणार नाही. तू शांत रहा.
तेव्हा प्रिया मुद्दाम नाटक करत सांगते की, बाबा तुम्ही लवकर आईला शोधा. मला माझ्या आई शिवाय राहणं कठीण होत चाललं आहे. हे ऐकल्यावर रविराजलाही चिंता वाटू लागते. त्यानंतर रविराज पोलिसांना फोन करुन विचारतो की प्रतिमाचा शोध सुरु आहे ना?, तिच्याबद्दल काही माहिती मिळाली का?, असं विचारतात. यावर इन्स्पेक्टर ही नाही असं सांगतात. तर प्रिया आणि नागराजचा हा डाव असतो. प्रिया नागराजला म्हणते की, काही केलं तरी आता याला बाहेर घेऊन जाऊन त्या डेड बॉडी जवळ न्यायला हवं पण मी डायरेक्ट बॉडीजवळ घेऊन गेले तर त्याला संशय येईल, असं म्हणून प्रिया एक प्लॅन करते. तर इकडे कल्पना रूममध्ये आलेली असते मात्र तिने अर्जुन व सायलीचं बोलणं ऐकलेलं नसतं. ती विचारते तू कोणाशी बोलत आहेस?, तेव्हा सायली अर्जुनचा व्हिडीओ कॉल दाखवते तेव्हा दोघेही खोटं सांगतात की, अर्जुनची फाईल शोधण्यासाठी त्यांनी व्हिडीओ कॉल केला होता. यावर कल्पनाचा विश्वास नसतो त्यानंतर ते दोघेही फोन ठेवतात तेव्हा कल्पना सांगते की, मी तुझ्यासाठी ड्रायफ्रूटचे लाडू आणि दूध आणलं आहे, तू रोज एक ड्रायफ्रूटचा लाडू खायचा. यावर सायली कशाला असे विचारते. तेव्हा कल्पना सांगते की, आता तू बाळाची आई होण्याचा निर्णय घेतला आहेस तर बाळाची आई स्ट्रॉंग नको का?, असं म्हणून ती बाळाच्या फोटोकडे पाहत राहते. त्यानंतर दोघीही बाळाच्या फोटोकडे पाहून स्वप्नात रमलेल्या असतात. तर कल्पना तिथून निघून गेल्यानंतर सायली ही बाळाच्या स्वप्नांमध्ये रमते. अर्जुन तिची काळजी घेताना तिला दिसतो, मात्र हे स्वप्न असतं हे कालांतराने तिला जाणवतं.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, सायली व अर्जुन एकत्र असतात तेव्हा कल्पना अर्जुनला सांगते की, आता तू सायलीची काळजी घ्यायला हवी, सायलीकडे विशेष लक्ष द्यायला हवं तेव्हा अर्जुनला कळत नाही की नेमक असं का बोलत आहे. तेव्हा अर्जुनसमोर सायली आई होणार असल्याचं येतं. त्यानंतर दोघेही रूममध्ये जातात तेव्हा ते दोघंही बाळाच्या आठवणीत रमतात आणि सांगतात की, आपण आता दोघेही हक्काने सांगू की हे आमचं बाळ आहे, हे बोलल्यावर एकमेकांना टाळी जायला जातात तेव्हा त्यांना शुद्ध येते. आता मालिकेच्या येणाऱ्या भागात सायली व अर्जुन बाळाच्या निमित्ताने तरी एकत्र येतील का हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.