देशात नुकत्याच लोकसभा निवडणुका पार पडल्या असून काल (४ जानेवारी) रोजी या निवडणुकांचा निकाल लागला. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. देशात पुन्हा भाजपची सत्ता येणार की नव्याने सत्तापालट होणार? याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. अशातच काल पार पडलेल्या या निकालावर एका अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक पसत शेर केली आहे आणि ही अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे.
अभिनेत्री रेणुका शहाणे या मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्री आहेत. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या या अभिनेत्री आपल्या राजकीय भूमिकांमुळेही चर्चेत राहत असतात. त्या सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर नेहमीच भाष्य करत असतात. अशातच कालच्या निकालानंतर रेणुका शहाणे यांनी एक खोचक पोस्ट शेर केली आहे. रेणुका यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे ही पोस्ट शेअर केली आहे.

रेणुका शहाणे यांनी इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे कालच्या निकालावर एक खोचक पोस्ट शेअर केली असून या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की, “राजकारण करा, पण कटकारस्थान, पक्ष फोडणे, ईडी व आयटीचा दूरुपयोग करु नका. खरे वाघ हे कोण ते कळलंच असेल. खरी श्रद्धा आणि श्रद्धेचा दिखावा यात खूप अंतर आहे. जनतेचा कौल विनम्रतेने स्वीकारा. जय हिंद, जय महाराष्ट्र.”
आणखी वाचा – Video : पारू, आदित्य व दिशा यांचा ‘पुष्पा-२’च्या ‘अंगारो सा…’ गाण्यावर भन्नाट डान्स, सेटवरचा व्हिडीओ व्हायरल
दरम्यान, रेणुका यांनी काही दिवसांपूर्वी एका कंपनीने मराठी तरुणांना नोकरी मिळणार नाही याबद्दलच्या एका पोस्टवरही आपली प्रतिक्रिया व्यक्ते केली होती. मराठी माणसांबरोबरच्या या दुजाभावावर रेणुका शहाणे यांनी आपला संताप व्यक्त केला होता. यावेळी त्यांनी मराठी माणसांबरोबर दुजाभाव करणाऱ्यांना मत देऊ नका असं म्हटलं होतं.
अशातच आता रेणुका शहाणे यांनी कालच्या निकालावरही त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. पण या पोस्टद्वारे त्यांनी नक्की कुणावर निशाणा साधला आहे? त्यांची ही खोचक पोस्ट नक्की कुणासाठी आहे. हे कळू शकलेले नाही.