‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, दिशा व दामिनी यांनी नवा डाव आखलेला असतो की, आदित्य आणि पारूच्या लग्नाचा व्हिडीओ काही करुन अहिल्यादेवींना दाखवायचा असतो त्यासाठी सगळेजण कॉन्फरन्समध्ये जमलेले असतात आणि व्हिडीओ पाहायला बसतात. त्यावेळी आदित्यला कळत नाही की, आता हे सगळं कसं थांबवावं. त्यावेळेला तो अहिल्यादेवीला सांगतो की, मला तुझ्याशी बोलायचं आहे पण त्या सांगतात की, हा व्हिडीओ झाला की आपण बोलूया. तू देखील बसून हा व्हिडीओ बघ तर पारू आणि प्रीतम काहीतरी काम सांगून कॉन्फरन्स रूममधून बाहेर येतात आणि काही झालं तरी हा व्हिडीओ आईने बघायला नाही पाहिजे असं प्रीतम म्हणतो आणि इंटरनेटची वायर कापून टाकायचं ठरवतो. (Paaru Serial Update)
त्यानंतर दोघंही इंटरनेटची वायर कापायला म्हणून जातात आणि अखेर प्रीतम ती वायर कापतो त्याच वेळेला व्हिडीओ थांबतो आणि आदित्यचा चेहरा दिसणार इतक्यात नेट जातं. तेव्हा मोहन म्हणतो की मी जाऊन चेक करतो की नक्की काय झालं आहे, तेव्हा मोहन येतो तर पारू आणि प्रीतम इंटरनेटची वायर कापून झाल्यावर बोलताना दिसतात. मोहन विचारतो, तुम्ही कसल्या व्हिडीओबद्दल बोलताय हे ऐकल्यावर प्रीतम घाबरतो आणि प्रीतम मोहन काकांना सगळं काही सांगून टाकतो. मात्र मोहन सांगतो की, मी तुम्हाला यांत मदत करीन पण जोवर वहिनींना माहित नाही आहे तोपर्यंत. वहिनींनी मला समोरून विचारलं तर मी जे काही आहे ते सत्य सांगून टाकीन. त्यानंतर तिकडून तिघेही निघून जातात तर इकडे दिशा व दामिनी विचार करतात की, नक्कीच हे प्रीतमने केलं असेल. आता काही करुन हा व्हिडीओ अहिल्यादेवींना मला दाखवावाच लागेल असं म्हणून त्या निघून जातात तर इकडे आदित्य अस्वस्थ होऊन खोलीत बसलेला असतो तेव्हा तिथं पारू येते आणि पारू म्हणते की, तुम्ही आज का अस्वस्थ आहात, तुम्ही माझ्याशी बोला, माझ्याकडे मन मोकळं करा.
तितक्यात खाली अहिल्यादेवींनी पारूच्या लग्नाच्या खरेदीसाठी साड्या आणि दागिने घेऊन बोलावलेलं असतं. तेव्हा त्या प्रीतमला पारूला खाली पाठवायला सांगतात. प्रीतम आदित्यच्या खोलीत जातो आणि पारुला सांगतो की, तुला खाली बोलावलं आहे. तू खाली निघून जा. तेव्हा पारू खाली येते तर प्रीतम आदित्यला समजावतो की, तू जास्त स्वतःला त्रास करून घेऊ नको हा निर्णय आपल्या दोघांचा होता आणि आता आई सध्या तुझ्या लग्नात, पारूच्या लग्नात आनंदी आहे त्यामुळे आता तिला दुखावून चालणार नाही, असं म्हणून त्याला समजावतो. तर पारू खाली गेल्यावर साड्या सिलेक्ट करायला अहिल्यादेवी सांगतात मात्र पारू काही पुढाकार घेत नाही तेव्हा अहिल्यादेवी स्वतः तिच्यासाठी साड्या आणि दागिने निवडतात आणि बिल ऑफिसमध्ये पाठवायला सांगतात. तेव्हा दामिनी पारूचा अपमान करते आणि सांगते की, या डिझाइनर साड्या घालायची तुझी लायकी तरी आहे का?, आणि तिथून निघून जाते. त्यानंतर आदित्य रात्री त्याच्या खोलीत बसून विचार करत असतो आणि त्या डोळ्यांकडे पाहत असतो आणि म्हणतो की हे डोळे माझ्या आईसारखेच आहेत। आजवर मी फक्त माझ्या आईवर प्रेम केलं आहे त्यामुळे त्यानंतर मला असं वाटतंय की, कदाचित मी आता या डोळ्यांच्या प्रेमात पडलो आहे हे नक्की प्रेमच आहे ना?, असं म्हणत असतानाच तितक्यात तिथे अहिल्यादेवी येतात. अहिल्यादेवींना पाहून आदित्य म्हणतो, तू इथे का आलीस?, मला बोलवायचं ना मी आलो असतो. यावर अहिल्यादेवी म्हणतात, असं काही नाही कामाच्या गडबडीमुळे आपल्याला गप्पा मारायला मिळतच नाही. आणि त्या गप्पा मारू लागतात आणि सांगतात की,आदित्य तुझी पार्टनर आता लवकरच शोधायची आहे आणि मला एक मुलगी पसंत आहे ते लोक उद्या आपल्याकडे येणारच आहेत हे सांगायला त्या आलेल्या असतात.
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्यसाठी पाहिलेल्या मुलीकडची मंडळी आदित्यला पाहण्यासाठी आलेली असतात तेव्हा आदित्यला पाहून म्हणतात की, तुम्ही छान मॉडेलिंग करता. हे ऐकल्यावर अहिल्यादेवींना कळतच नाही त्या नेमका कशाबद्दल बोलत आहेत. यावर अहिल्यादेवी म्हणतात मॉडेलिंग?, तुम्ही नक्की कोणाबद्दल बोलत आहात?, आता मालिकेच्या येणाऱ्या भागात पारू व आदित्यच्या लग्नाचं सत्य अहिल्यादेवी समोर येणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.