बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

भाचीच्या लग्नात मामाचीचं हवा! अखेर आरती सिंहच्या लग्नात पोहोचला गोविंदा, मीडियासमोर येत म्हणाला, “देवाकडे प्रार्थना करतो की…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 26, 2024 | 10:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Govinda At Aarti singh Wedding

भाचीच्या लग्नात मामाचीचं हवा! अखेर आरती सिंहच्या लग्नात पोहोचला गोविंदा, मीडियासमोर येत म्हणाला, "देवाकडे प्रार्थना करतो की…"

टीव्ही विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आरती सिंहचे लग्न बरेच दिवसांपासून चर्चेत राहिले. आरतीच्या लग्नाचे अनेक व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. आरतीच्या लग्नाची चर्चा आणखी एका गोष्टीमुळे रंगली ती म्हणजे तिचा मामा गोविंदा भाचीला लग्नाला हजेरी लावणार की नाही यामुळे. मात्र अखेर नववधूला आशीर्वाद देण्यासाठी बॉलिवूडचा सुपरस्टार व आरती सिंहचा मामा गोविंदा लग्नात पोहोचला. आरतीने पेशाने व्यावसायिक असणाऱ्या दीपक चौहानशी लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. (Govinda At Aarti singh Wedding)

जुहू येथील इस्कॉन मंदिरात या दोघांचा शाही विवाहसोहळा पार पडला. भाचीच्या लग्नात त्याने स्टायलिश एन्ट्री घेतलेली पाहायला मिळाली. काळ्या रंगाचा जोधपुरी ड्रेस परिधान करुन हिरो नंबर १ ने लग्नात शानदार एन्ट्री केली. आरतीच्या लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावलेली पाहायला मिळाली. लग्नासाठी करण सिंग ग्रोव्हर व बिपाशा बसूही आले होते.

आणखी वाचा – अहिल्यादेवींना वाचवून पारूचा जीव धोक्यात, प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं अन्…; आदित्य तिला वाचवू शकेल का?

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आरतीच्या लग्नादरम्यान गोविंदानेही मीडियाशी थोडासा संवाद साधला. भाचीच्या लग्नात गोविंदा एकटाच पोहोचला होता आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा आणि मुले यशवर्धन व टीना हे उपस्थित नव्हते. यावेळी इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना गोविंदा म्हणाला, “मी देवाकडे प्रार्थना करतो की, आरतीला अनेकानेक आशीर्वाद. तिला कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष होऊ नये”. आरतीच्या लग्नात सिनेतारे-तारकांनी जल्लोष केला. इंडस्ट्रीतील बड्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. गोविंदा त्याच्या व कृष्णाच्या कुटुंबातील वैर बाजूला ठेवून आरती व दीपकच्या लग्नाला उपस्थित राहिला आणि दोघांना आशीर्वादही दिला.

आणखी वाचा – अवाढव्य खर्च, शाही थाटमाट अन्…; आरती सिंह व दीपक चौहान यांचा विवाहसोहळा संपन्न, नववधूच्या लूकची होतेय चर्चा

कमीतकमी मेकअपसह लाल रंगाच्या वधूच्या लेहेंग्यात आरती खूपच सुंदर दिसत होती. तर नवरा मुलगाही पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये उठून दिसत होता. आरतीचा लेहेंगा पाहून नेटकरीही खूप प्रभावित झाले आणि त्यांनी तिची खूप प्रशंसा केली. आरती व दीपक यांच्या लग्नाची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली. आरतीचा नवरा दीपक चौहान लग्नाच्या मिरवणुकीत वधूला घेऊन जाण्यासाठी नाचत आलेलाही दिसला. आरती व दीपकला शुभेच्छा देण्यासाठी अरबाज खान, शहजादा धामी, युविका चौधरी, रश्मी देसाई, देवोलिना भट्टाचार्जी यांच्यासह अनेकांनी लग्नाला हजेरी लावली होती.

Tags: Aarti Singh And Dipak ChauhanAarti Singh And Dipak Chauhan WeddingentertainmentGovinda At Aarti singh Wedding
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Rakhi Sawant and Raqesh Bapat bonding
Entertainment

“मला माझा संसार हवाय”, राकेश बापटच्या एकतर्फी प्रेमात आहे राखी, म्हणाली, “मी बॉलिवूड सोडेन”

एप्रिल 15, 2026 | 4:38 pm
Rakhi Sawant Interview
Entertainment

वडिलांचा विरोध, छोटे कपडे घालून आयटम साँग आणि…; Dramaqueen राखी सावंतचा स्ट्रगल, म्हणाली, “कोणाचा बाप बसलाय…”

एप्रिल 15, 2026 | 1:26 pm
Bobby Deol alcohol quit
Entertainment

“कुटुंबातील सदस्य घाबरले”, दीड वर्षांपासून दारूपासून दूर राहिलाय बॉलिवूड अभिनेता, लवकर थकायचा आणि…

एप्रिल 15, 2026 | 11:49 am
rakhi sawant desinger dress
Entertainment

‘बिग बॉस मराठी’च्या फिनालेसाठी १२ लाखाचा ड्रेस, राखी सावंतची जय्यत तयारी, दुबईला जाऊन…

एप्रिल 15, 2026 | 11:08 am
Next Post
Shiva serial fame Shalva Kinjawadekar will soon tie the knot with Shreya Daflapurkar

शाल्व किंजवडेकरची लगीनघाई, लवकरच अडकणार विवाहबंधनात, बायकोबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाला, "मुहूर्त..." 

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.