शनिवार, जून 13, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अहिल्यादेवींना वाचवून पारूचा जीव धोक्यात, प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं अन्…; आदित्य तिला वाचवू शकेल का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 26, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Update

अहिल्यादेवींना वाचवून पारूचा जीव धोक्यात, प्रकृती गंभीर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं अन्…; आदित्य तिला वाचवू शकेल का?

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत रंजक वळण येत असून ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडताना पाहायला मिळत आहे. मालिकेत सध्या अहिल्यादेवींचं व्रत सुरू असलेल पाहायला मिळालं. अहिल्यादेवींचं हे व्रत पारूमुळे पूर्ण झाले असल्याचंही सर्वांसमोर आलं. व्रत पूर्ण करत असताना पाण्याचे २१ हंडे त्यांना नदी काठापासून मंदिरापर्यंत घेऊन जायचे असतात यावेळीच मधल्या एका फेरीत अहिल्यादेवींच्या हाताला साप चावतो. त्यावेळेला पारू तिथे असते. (Paaru Serial Update)

पारू खूपच घाबरलेली असते, तिच्या देवी आईला काही होऊ नये म्हणून पारू स्वतःच्या तोंडाने अहिल्यादेवींना साप चावलेल्या जागी तोंडातून सगळं विष काढून बाहेर फेकून देते आणि त्यानंतर अखेर अहिल्यादेवी त्यांचे व्रत पूर्ण करू शकतात. मात्र इकडे पारूचा जीव धोक्यात आलेला असतो. अहिल्यादेवी जेव्हा तिला प्रसाद द्यायला जातात तेव्हा पारूला चक्कर येते. त्यानंतर लगेचच आदित्य, प्रीतम व मारुती पारुला घेऊन हॉस्पिटलमध्ये जात असतात. हॉस्पिटलमध्ये जाताना पारू डोळे बंद करून घेते. त्यामुळे आदित्य, प्रीतम मारुती यांचं टेन्शन आणखी वाढतं हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर पारूची कंडीशन ही क्रिटिकल असल्याचं सांगतात. त्यानंतर लगेचच तिला आयसीयूमध्ये दाखल केलं जात.

आणखी वाचा – स्त्रीरोगविषयक समस्या, ५-६ शस्त्रक्रिया अन्…; वाढत्या वजनावर क्षिती जोगने दिलं स्पष्टीकरण, म्हणाली, “त्याबाबत थोडी आळशी…”

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

मालिकेत पुढे असं पाहायला मिळाले की इकडे अहिल्यादेवींना सुद्धा डॉक्टर तपासायला आलेले असतात. त्या उपचार घेत असतात तर त्यांना काळजी घेण्याची आवश्यकता असते असं सांगण्यात येतं. तर इकडे पारूच्या जीवाला धोका असतो असं डॉक्टर सांगतात. तिला लवकरात लवकर रक्ताची गरज लागेल आणि तिचा जो ब्लड ग्रुप आहे ते रक्त आता तरी इथे कुठेच नाही आहे. आणि रक्त मिळालं नाहीतर पारू कोमामध्ये जाईल असंही ते सांगतात. त्यानंतर आदित्य डॉक्टरांना विचारतो की, रक्त जमा करायला असा कमीत कमी आपल्याजवळ किती वेळ आहे?, हे ऐकल्यावर डॉक्टर म्हणतात, फक्त सहा तास. सहा तासाच्या आत रुग्णासाठी आपल्याला हे रक्त उपलब्ध करून द्यावेच लागेल.

आणखी वाचा – मेष ते मीन राशीमध्ये ‘या’ राशीच्या लोकांना होणार आर्थिक फायदा, शुक्रवारचा दिवस कुणासाठी कसा असणार?, जाणून घ्या

पारूच्या रक्ताचा बॉम्बे ब्लड ग्रुप हा फार विरळ असल्याने आता आदित्य प्रीतम समोर खूप मोठं संकट येऊन उभं राहिलं आहे. तर इकडे अहिल्यादेवींना झोप येण्यासाठी डॉक्टरांनी दिलेल्या झोपेच्या गोळ्या दिशा मोठ्या प्रमाणात घेऊन त्या अहिल्यादेवींच्या दुधात मिक्स करते. आता ते दूध अहिल्यादेवी पिणार का?, सहा तासाच्या आत आदित्य व प्रीतम या ब्लड ग्रुपचं रक्त आणून देणार का?, पारूचा जीव वाचणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Aarti Singh And Dipak Chauhan Wedding

अवाढव्य खर्च, शाही थाटमाट अन्…; आरती सिंह व दीपक चौहान यांचा विवाहसोहळा संपन्न, नववधूच्या लूकची होतेय चर्चा

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.