शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘ठरलं तर मग’ मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार “मधुभाऊंची सुटका होणार का?”, सायलीला मिळणार जोगतीणी कडून उत्तर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 18, 2023 | 10:18 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tharal Tar Mag New Promo

'ठरलं तर मग' मालिकेच्या नव्या प्रोमोनुसार "मधुभाऊंची सुटका होणार का?", सायलीला मिळणार जोगतीणी कडून उत्तर

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत असतात. अशातच ‘ठरलं तर मग’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत ही अव्वल स्थानावर आहे. या मालिकेत आलेल्या अनेक टर्न अँड ट्विस्टमुळे ही मालिका रंजक बनली आहे. मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तर मालिकेतील सायली व अर्जुन या जोडीवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. मालिकेत रंजक वळण येत असताना नुकतीच मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एंट्री झाली आहे. मालिकेच्या समोर आलेल्या नव्या प्रोमोवरून हे समोर आलं आहे. (Tharal Tar Mag New Promo)

‘हे मन बावरे’, ‘बॉस माझी लाडाची’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे माधवी जुवेकर. प्रोमोनुसार माधवी जुवेकरने ‘ठरलं तर मग’ मालिकेत जोगतिणीच्या रूपात एंट्री घेतली आहे. सध्या मालिकेत नवरात्रोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. अशातच नवरात्रीनिमित्त जोगतिणीच्या रूपात माधवीची एंट्री मालिकेत झाली आहे. सुभेदारांच्या घरात जोगतीणीची एंट्री झाली आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जोगतीण सांगते की, याठिकाणी उभा असलेला प्रत्येक मनुष्य नाटक करत आहे. त्यानंतर सायली जोगतीणीचा सत्कार करून देवीच्या पूजेला लागते. दरम्यान सायलीही येणाऱ्या अडथळ्यांना लढण्याचं बळ दे असं साकडं जोगतिणीचा आशीर्वाद घेत सांगते. यावेळी जोगतीण सायलीला खास आशीर्वाद देते.

आणखी वाचा – “हा पुरस्कार तुमचा”, राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर सलील कुलकर्णींचा आनंद गगनात मावेना, आईही होती बरोबर, म्हणाले, “ज्यांच्यामुळे प्रत्येक…”

जोगतीण सायलीला आशीर्वाद देताना म्हणते, “काळजी करू नकोस सायली. तुला एका मोठ्या अग्नीदिव्याला तोंड द्यावं लागतंय. पण, तुझ्यात एवढं पावित्र्य आहे की, कोणतीही वाईट गोष्ट तुझ्या आजूबाजूला फिरकू शकणार नाही. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील.” यावर सायली जोगतीणीला आमचे मधूभाऊ सुटतील का? असा प्रश्न विचारत असल्याचं, नव्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

View this post on Instagram

A post shared by ठरलं तर मग..!!???? (@tharlatarmag_official)

आणखी वाचा – “ही सून आहे का?” अरुण कदम यांच्या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्याची कमेंट, पत्नी वैशाली कदम यांनी दिला रिप्लाय, म्हणाल्या…

सायलीच्या या प्रश्नावर जोगतीण आता काय उत्तर देणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे. सायलीच्या इच्छेनुसार मधुभाऊंची सूटका होणार का? मधुभाऊंना शिक्षा घडवणाऱ्यांना अद्दल घडणार का? हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल. तर आधीच्या प्रोमोनुसार अर्जुन आणि सायलीचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य सगळ्यांसमोर येणार का? याला सायली व अर्जुन कसे सामोरे जाणार हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: entertainmentmarathi malikamarathi serialstar pravahtharal tar magtharal tar mag new promotharal tar mag serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Farhan Akhtar post on Zindagi Na Milegi Dobara sequel

'जिंदगी ना मिलेगी दोबारा'चा सिक्वेल येणार, 'या' अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं चाहत्यांचे लक्ष, म्हणाला, "आम्ही मुलं…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.