अभिनेते अरुण कदम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या छोट्या पडद्यावरील विनोदी कार्यक्रमामुळे जितके लोकप्रिय झाले, तितकेच ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येत असतात. अरुण यांची पत्नी वैशाली कदम आणि मुलगी सुकन्या या दोघी त्यांच्यासाठी विशेष आहे. अरुण यांना त्यांच्या संघर्षाच्या काळात त्यांच्या पत्नी व मुलीने खंबीर साथ दिली होती. त्यामुळेच ते नेहमी त्यांच्या पत्नीचं विशेष कौतुक करताना दिसतात. (Arun Kadam wife replies to Netizens)
काही महिन्यांपूर्वी अरुण कदम यांच्या घरी नातवाचे आगमन झाले होते. त्यानंतर त्यांच्या नातवाचा नामकरण सोहळा पार पडला होता. या सोहळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अजूनही त्या व्हिडिओची चर्चा होत असते. दरम्यान, या व्हिडिओवर एका नेटकऱ्याच्या कमेंटवर पत्नी वैशाली यांनी रिप्लाय दिला आहे.
हे देखील वाचा – “मराठी चित्रपटांची हवा पुण्याच्या बाहेर का नाही?”, नेटकऱ्यांनी मराठी अभिनेत्रीला सुनावलं, उत्तर देत म्हणाली, “खूप त्रास होतो पण…”
अरुण यांच्या पत्नी वैशाली कदम यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर नातवाच्या बारश्याचं एक व्हिडिओ पोस्ट केला होता. जो त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरला व त्यांनी कदम कुटुंबियांचे अभिनंदन केले होते. दरम्यान, या व्हिडिओवर एका नेटकऱ्याने “ही तुमची सून आहे का?” असा प्रश्न अरुण यांना विचारला. त्यावर वैशाली यांनी “नाही, मी त्यांची बायको आहे” असा रिप्लाय दिला. पुढे त्या नेटकऱ्याने त्यांची माफी मागितली आणि त्यांचे कौतुक केले. वैशाली यांच्या या रिप्लायची सध्या चर्चा होत आहे.
हे देखील वाचा – Video : अरुण कदम यांना गरबा खेळण्याचा मोह आवरेना, मंचावरच मराठी अभिनेत्रीसह केला धमाल डान्स, व्हिडीओ व्हायरल
गेल्या काही दिवसांपासून अरुण कदम हास्यजत्रेबरोबर अनेक कारणांनी चर्चेत असतात. नुकताच ते सोशल मीडियावर परतले असून त्यांचे विविध व्हिडिओज सध्या धुमाकूळ घालताना दिसत आहे. ते सध्या हास्यजत्रेच्या शूटिंगमध्ये व्यग्र असतात. शिवाय ते त्यांच्या कुटुंबियांसह एकत्र वेळ घालवताना दिसतात.