‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘ठरलं तर मग’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. मालिकेच्या कथानकाने या मालिकेच्या प्रेक्षकवर्गाला खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. या मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे. मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांनी ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. सध्या मालिकेत सायली व अर्जुन यांच्यामध्ये प्रेम फुलताना दिसत आहे. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडल्याचं दिसत आहे. मात्र दोघांनीही त्यांच्या प्रेमाची कबुली अद्याप दिलेली नाही. (Tharal Tar Mag Promo)
मालिकेत अर्जुनच्या कॉलेजचं रियुनियन असल्याचं पाहायला मिळत आहे. कॉलेजच्या रियुनियनसाठी अर्जुन खूप खुश असतो. अर्जुन रियुनियनला जाताना सायलीला घेऊन जायचं ठरवतो. त्यामुळे सायलीला रियुनियनला जायचं दडपण येतं. मात्र अर्जुन सायलीला समजावतो आणि तुम्ही आहात तशाच या, तुम्ही तशाच सुंदर दिसता असं म्हणत सायलीची समजूत काढतो. अशातच मालिकेच्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये सायली व अर्जुन दोघेही रियुनियनला पोहोचलेले दिसत आहेत.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये, सायली व अर्जुन ‘हा जीव बावरा’ या गाण्यावर परफॉर्म करतात. सायली हे गाणं गात असते तर अर्जुन या गाण्यावर गिटार वाजताना दिसत आहे. यावेळी दोघांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. दोघंही या रियुनियन पार्टीमध्ये खूप खुश असलेले दिसत आहेत. एकमेकांकडे पाहत सायली व अर्जुन गाणं एन्जॉय करताना दिसत आहेत. यावेळी तिथे जमलेले इतरही मित्रमंडळी हे गाणं एन्जॉय करत होते. त्यानंतर सगळेच जण धमाल-मस्ती करत असताना सायली तिथे असलेल्या अर्जुनच्या मित्रांचे जुने फोटो पाहत असते. त्यावेळी सायलीच्या हाताला साक्षीचा फोटो लागतो.
साक्षीचा फोटो इथे कसा असा प्रश्न सायलीला पडतो. मात्र सायली तेव्हा तिथे काहीच बोलत नाही, त्यानंतर ती तो फोटो घेऊन घरी येते. घरी आल्यानंतर सायली तो फोटो अर्जुनच्या हातात देते आणि म्हणते की, “हा फोटो बघा”. अर्जुन तो फोटो हातात घेतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसतो. सायली अर्जुनला विचारते, “तिने ज्या मुलीला मिठी मारली आहे तो मुलगा कोण आहे?”, यावर अर्जुन म्हणतो, “कुणाल. म्हणजे कुणालची गर्लफ्रेंड साक्षी होती”. आता अर्जुनसमोर खऱ्या साक्षी शिखरेचा चेहरा समोर आलेला आहे. साक्षी ही त्यांच्याच कॉलेजची मुलगी असून ती अर्जुनचा मित्र कुणालची गर्लफ्रेंड असते. आता अर्जुन साक्षीचा खरा चेहरा ओळखणार का?, याचा वापर तो त्याच्या केससाठी करणार का?, हे सर्व पाहणं मालिकेत रंजक ठरेल.