अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा नवरा राज कुंद्रा यांच्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. या दाम्पत्याच्या अडचणी पुन्हा वाढताना दिसत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, ईडीने शिल्पाचा पती राज कुंद्रा यांच्यावर मोठी कारवाई करत त्यांची करोडोंची संपत्ती जप्त केली आहे. ईडीने मनी लॉन्ड्रींग प्रकारनात शिल्पा शेट्टी व राज कुंद्राच्या मालकीची ९७.७९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. (Shilpa Shetty Raj Kundra properties seized by ED)
ईडी, मुंबईने पीएमएलए, २००२ च्या तरतुदींनुसार रिपू सुदान कुंद्रा उर्फ राज कुंद्रा यांच्या ९७.७९ कोटी रुपयांच्या स्थावर आणि जंगम मालमत्ता तात्पुरती जप्त केली असल्याचं समोर आलं आहे. जप्त केलेल्या या मालमत्तेत जुहू येथील निवासी फ्लॅटचाही समावेश असल्याचं समोर आलं आहे. हा फ्लॅट सध्या शिल्पा शेट्टीच्या नावावर आहे. याशिवाय त्यांचा पुण्यातील निवासी बंगला आणि इक्विटी शेअर्स हे राज कुंद्राच्या नावावर आहेत.
ED, Mumbai has provisionally attached immovable and movable properties worth Rs 97.79 crores belonging to Ripu Sudan Kundra aka Raj Kundra under the provisions of PMLA, 2002. The attached properties include a Residential flat situated in Juhu presently in the name of Smt. Shilpa…
— ANI (@ANI) April 18, 2024
प्रौढ चित्रपटांच्या निर्मिती व प्रसार प्रकरणी शिल्पाचा नवरा राज कुंद्रा यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. ईडीने सांगितले की, अंदाजे ९७.७९ कोटी रुपयांची स्थावर, जंगम मालमत्ता कुंद्रा दाम्पत्याची आहे आणि ही कारवाई मनी लॉन्ड्रींग प्रतिबंधक कायद्यान्वये करण्यात आली आहे. ही कारवाई PMLA, २०२२ अंतर्गत करण्यात आली आहे. यामध्ये शिल्पा शेट्टीच्या नावावर असलेल्या मुंबईतील जुहू भागातील निवासी सदनिका, तसेच पुण्यातील बंगला आणि कुंद्राच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.
gatbitcoin.com या वेबसाइटवरुन अनेकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात राज कुंद्रा यांचं कनेक्शन सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. काही वर्षांपूर्वी पुणे पोलिसांनी कोट्यवधीच्या बीटकॉइन घोटाळ्याप्रकरणी भारद्वाज बंधूंना अटकही केली होती. त्याचाच भाग म्हणून कुंद्रांची चौकशी करण्यात आली होती.