शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘कलर्स मराठी’वरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवटचे सीन शूट करताना कलाकार मंडळींना भावना अनावर

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 18, 2024 | 12:46 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Colors Marathi Serial

'कलर्स मराठी'वरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, शेवटचे सीन शूट करताना कलाकार मंडळींना भावना अनावर

‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या मालिकेतील राज-कावेरीच्या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. ४ एप्रिल २०२२ रोजी या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला. अशातच आता या मालिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. प्रेक्षकांची ही लाडकी मालिका आता निरोप घेणार असल्याचं समोर आलं आहे. लवकरच ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका ऑफ एअर जाणार असल्याचं समोर आलं. (Colors Marathi Serial)

नुकतंच या मालिकेच्या व्रॅपअप पार्टीचे खास फोटोही समोर आले. “खूप सुंदर टीम आणि छान माणसं या लोकांबरोबर काम करून खूप समाधान मिळालं. ‘भाग्य दिले तू मला’ मालिकेच्या सगळ्या टीमचं खूप खूप अभिनंदन…थँक्यू मला पियू ही भूमिका साकारण्याची संधी दिल्याबद्दल” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने मालिकेची संपूर्ण टीम, तन्वी, विवेक, निवेदिता सराफ यांचे आभार मानले. शूटिंगच्या शेवटच्या क्षणी सगळेच कलाकार भावुक झालेले पाहायला मिळाले.

आणखी वाचा – Video : जॉनी लिव्हर यांचा मुलगा व लेकीसह ‘गुलाबी साडी’वर भन्नाट डान्स, चेहऱ्यावरचे हावभाव पाहून सगळ्यांनाच हसू अनावर, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by BHAGYASHREE DALVI???? (@bhagyashri2468)

मालिकेच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी व्रपअप पार्टी आयोजित करण्यात आली. यावेळी कलाकारांनी केक कट करत फोटो,व्हिडीओ काढले. प्रेक्षकांची ही आवडती मालिका ऑफ एअर जाणार असल्याचं समजताच अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर सध्या नवनवीन मालिका येत असल्याचं समोर आलं आहे. नवीन मालिका आल्याने आता जुन्या मालिकेला वाहिनीने राम राम केला आहे. ‘इंद्रायणी’, ‘सुख कळले’, ‘हसताय ना हसायलाच पाहिजे’, या मालिका कलर्स मराठी वाहिनीवर सुरु झाल्या आहेत.

आणखी वाचा – तेल मालिश अन्…; आईकडून लाड करुन घेत आहे मृण्मयी देशपांडे, बहीण गौतमीला चिडवत व्हिडीओ केला शेअर, म्हणाली, “प्रवास करुन…”

स्पृहा जोशीच्या ‘सुख कळले’ ही मालिका २२ एप्रिलपासून सुरु होणार असून या मालिकेला रात्री ९ वाजताची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे रात्री ९ वाजता लागणाऱ्या ‘रमा राघव’ या मालिकेची वेळ बदलून रात्री ९.३० वाजताची केली आहे. तर आता दररोज ९.३० वाजता प्रसारित होणारी ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

Tags: colors marathiColors Marathi Serialentertainmentmarathi malikamarathi serial
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
arti singh wedding card

लग्नाआधी काशी विश्वनाथ दर्शन आणि लग्नपत्रिका घेऊन पोहोचली गोविंदाची भाची, इतकी सुंदर आहे पत्रिका, मंडपही सजला अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.