अभिनेता शेखर सुमन सध्या ‘हिरामंडी – द डायमंड बाजार’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ते सध्या खूप व्यस्त आहेत. या वेबसीरिजच्या निमित्ताने त्यांच्याबद्दलच्या अनेक गोष्टींचे खुलासे झाले. शेखर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या दु:खद प्रसंगाबद्दल त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. शेखर यांना दोन मुलं होती. पण त्यांचा मोठा मुलगा आयुषचे कमी वयातच निधन झाले. त्यामुळे शेखर यांना मोठा धक्का बसला होता. त्याबद्दल ते आता व्यक्त झाले आहेत. (shekhar suman son death)
शेखर हे टेलिव्हिजन क्षेत्रातील खूप प्रसिद्ध कलाकार आहेत. त्यांनी अनेक मालिका, कार्यक्रमांमध्ये दिसून आले होते. तसेच त्यांनी अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालनदेखील केले होते. मध्ये अनेक वर्ष ते अभिनयापासून लांब होते. मात्र आता ते सुप्रसिद्ध निर्माते संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी- द डायमंड बाजार’ या वेबसीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसून येणार आहेत. या सीरिजचे प्रमोशन सध्या सुरु असून सर्व कलाकार यामध्ये व्यस्त असलेले पाहायला मिळत आहेत. त्यावेळी शेखर यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आलेल्या कठीण प्रसंगाबद्दल सांगितले आहे.
शेखर यांचा मोठा मुलगा आयुष 11 वर्षाचा असतानाच जगाचा निरोप घेतला होता. त्याला नॅशनल ऑर्गनायजेशन फॉर रेअर डिसऑर्डर या रोगाने पीडित होता. या रोगाचा परिणाम थेट हृदयावर होतो. त्यामुळे शेखर यांनी या रोगाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि मुलाला गमावल्याचे दु:ख त्याने बोलून दाखवले आहे.
याबद्दल त्यांनी सांगितले की, “हा रोग खूप दुर्मिळ असून लाखांमध्ये केवळ एखाद्यालाच होतो. भारतामध्ये केवळ असे चार रोगी आहेत. याला उपचार म्हणजे हृदय प्रत्यारोपण आहे”. मुलाची आठवण काढताना तो पुढे म्हणाला की, मी जेव्हा आयुषला रुग्णालयात घेऊन गेलो तेव्हा तो माझ्या कुशीत होता. पण जेव्हा डॉक्टरांनी पाहिलं तेव्हा तो या जगात नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले”.
पुढे तो म्हणाला की, “त्याचे पार्थिव घेऊन मी रात्रभर जागा होतो. मी खूप रडलो. माझी पत्नी अलकाची अवस्थादेखील खूप खराब झाली होती. मुलाच्या पार्थिवाला अग्नी देण्यापेक्षा भयंकर असे आई-वडिलांसाठी काहीही असू शकत नाही, “असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान शेखर सध्या नवीन सीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सीरिजमध्ये त्यांच्याबरोबर मनीषा कोइराला, ऋचा चढ्ढा, संजीदा शेख, सोनाक्षी सिंन्हा, फरदीन खान हे कलाकार दिसणार आहेत.