सिनेमासृष्टीत बरेच असे कलाकार आहेत ज्यांनी खडतर प्रवास करून आपलं नाव मोठं केलं आहे. सिनेक्षेत्रात कुणीही वारस नसताना बऱ्याच कलाकारांनी स्वमेहनतीने आपलं स्थान तयार केलं. या कलाकारांच्या यादीत एक नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे टीव्ही जगतातील अभिनेत्री जुई गडकरी. आजवर जुईने तिच्या साध्या भोळ्या, संयमी, सुसंस्कारी स्वभावाने रसिक प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. जुईने तिच्या अभिनय कौशल्याने रसिक प्रेक्षकांच्या मनावर ताबा मिळवला असून तिचा असा स्वतःचा खूप मोठा फॅन फॉलोविंग आहे. (Jui Gadkari On Ask Me Anything)
सध्या जुई ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील अव्वल स्थानावर असलेल्या ‘ठरलं तर मग’ या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळतेय. या मालिकेवर व मालिकेतील जुईच्या भूमिकेवर चाहते भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेत जुई सायली या भूमिकेत पाहायला मिळतेय. मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. जुईचा सोशल मीडियावरही मोठा वावर असलेला पाहायला मिळतो. नेहमीच ती काही ना काही शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात राहत असते.
अशातच जुईने नुकतंच चाहत्यांसह ‘आस्क मी एनिथिंग’ सेशन ठेवलं होतं, यावेळी तिने अनेक चाहत्यांच्या प्रश्नांची मनमोकळेपणाने उत्तरे दिली. दरम्यान “तुम्ही इतक्या साध्या कशा राहता, आणि रिअल लाईफमध्ये पण असाच साधा स्वभाव आहे का? की स्टायलिश राहता एकदम?” असा प्रश्न जुईला तिच्या चाहत्यांनी विचारला असता, या प्रश्नाच उत्तर देत जुई म्हणाली, “सगळे माझी या बाबतीत खूप चेष्ठा करतात, पण मला जमत नाही नखरे करायला. मी जशी आहे तशीच राहू शकते. मी फक्त विचारांनी मॉडर्न आहे. बाकी एकदम मला सगळे चिडवतात तशी गाववाली.”
चाहत्याने विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे जुई रील व रिअल लाईफमध्ये साधी सरळ आहे, हे साऱ्यांनाच माहित आहे. विचारांनी मॉडर्न असलेली जुई राहणीमानाने अत्यंत साधी आहे. उत्तम कलाकारांच्या यादीत जुईचं नाव असलं तरी तिने तिची मर्यादा कधीच ओलांडलेली नाही. कायम नम्र, संयमी स्वभावाने आजवर तिने सारं काही सांभाळलं आहे.