शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अनिरुद्धचं नाव इतकं बदनाम झालंय की…”, ‘आई कुठे…’ ट्रोल होत असताना मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, म्हणाले, “वाईट माणूस असला तरी…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑक्टोबर 14, 2023 | 11:48 am
in Entertainment
Reading Time: 7 mins read
google-news
milind gawali share a post related anirudh character

milind gawali share a post related anirudh character

छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे. मालिकेतील सर्व कलाकारांनाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळताना दिसतं. त्यातील अनिरुद्ध देशमुख हे नकारात्मक पात्रं विशेष लोकप्रियता मिळवत आहे. ही भूमिका साकारणारे अभिनेता मिलिंद गवळी यांच्या अभिनयाचं तर प्रेक्षक बरंच कौतुक करताना दिसतात. पण ते साकारत असलेल्या पात्राचा तितकाच द्वेषही केला जातो. स्वतः मिलिंदही यापात्राबाबत बऱ्याचदा लिहिताना दिसतात. नुकतंच त्यांनी सोशल मीडियावर या पात्राबद्दल पोस्ट लिहिली आहे. त्यांनी या मालिकेतील एक सीन शेअर करत त्यांनी अनिरुद्धबद्दल भरभरून लिहीलं आहे. (milind gawali share a post related anirudh character)

मिलिंद नेहमी वैयक्तिक आयुष्यातील क्षणांसह इतर कामाच्या ठिकाणचेही फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकताच त्यांनी सेटवरील एक सीनचा व्हिडिओ शेअर केला आहे. तो शेअर करत त्यांनी साकारत असलेल्या अभिरुद्धबद्दल लिहिलं आहे. या मालिकेत सध्या विविध वळणं येत आहेत. मालिकेत आरोहीबरोबर घडलेला प्रसंग आणि आता त्यावर अनिरुद्धने मांडलेलं मतं यामुळे अनिरुद्ध नेमका कसा आहे?, याबाबत सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे. तसाच प्रश्न मिलिंद यांना देखील पडला होता. याबाबतचं उत्तर त्यांनी कॅप्शनमध्ये दिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

आणखी वाचा – “तिच्यामुळे मी लग्न करु शकत नाही”, तनुश्री दत्ताची राखी सावंत विरोधात पोलिसांत तक्रार, नाना पाटेकरांचाही केला उल्लेख, म्हणाली, “तिने मला…”

मिलिंद लिहीतात, “Good over Evil, अनिरुद्ध देशमुख ज्यावेळेला असं मत मांडतो त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये आणि माझ्या मनामध्ये पण असा विचार येतो की आता या माणसाचं काय करायचं, माणूस इतका चांगला पण वागू शकतो का ?, असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. अनिरुद्धच नाव इतकं बदनाम झालं आहे, की तो जे करेल ते चुकीचं आहे असं मनामध्ये भावना येणं साहजिक आहे. काही परिस्थितीमध्ये हा माणूस अगदी हिरो सारखाच वागतो. सगळ्यांना अचंबित करतो. मी पण ज्या वेळेला स्क्रिप्टवाचतो त्यावेळ नकळत माझ्या चेहऱ्यावर एक हास्य येते, मन भरून येतं, डोळे सुद्धा भरून येतात. मनातल्या मनात नमिता वर्तकला धन्यवादसुद्धा म्हणत असतो. पण खरंच आहे किती वाईट माणूस असला तरी काही बाबतीत माणसाने ठांब भूमिका घ्यायलाच हव्या. योग्य माणसांना साथ द्यायलाच हवी”.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

आणखी वाचा – “खूप रडणार कारण…”, लेकीच्या लग्नाची तारीख सांगत आमिर खानचं होणाऱ्या मराठमोळ्या जावयाबाबत भाष्य, म्हणाला, “मला कोण सांभाळणार?”

मिलिंद पुढे लिहितात, “मुंबई पोलिसांच्या बाबतीत एक खूप चांगली गोष्ट ऐकली आहे, ती म्हणजे खात्यामध्ये भ्रष्टाचार आहे, पण एखादा पोलिसवाला कितीही भ्रष्ट असला तरी असं म्हटलं जातं की रेप, मर्डर, ड्रिंक आणि ड्राईव्ह, ड्रग्स अशा केसेसमध्ये कुठलाही पोलिसवाला कधीही पैसे खात नाही. अशा गुन्हेगाराला तो कधीही साथ देत नाही. कदाचित अनिरुद्ध देशमुखचं असंच काहीतरी असावं. या सीनमध्ये ज्यावेळेला तो आरोहीची बाजू घेऊन बोलतो, जे प्रत्येकाने करायला हवं तेच करतो, त्यावेळेला खरंच अनिरुद्ध साकारायला मला मजा येते. मला रोज अनिरुद्धची एक नव्याने ओळख होत जाते आणि पुन्हा एकदा त्या अनिरुद्ध देशमुखच्या प्रेमात पडावसं वाटतं. हा अनिरुद्ध देशमुख नमिता वर्तक आणि राजनजी शाही यांच्या विचाराने घडत जात असतो, खरं तर माझ्या हातात काहीच नाहीये, लोकं मला त्या भूमिकेसाठी ओळखतात. पण अनिरुद्ध देशमुख हे तेच घडवत असतात. प्रेक्षकांसारखा मी सुद्धा आतुरतेने वाट बघत असतो की आता अनिरुद्धची काय भूमिका आहे”, असं लिहिल आहे.

View this post on Instagram

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

आणखी वाचा – “प्रार्थना बेहरेचा नवरा तिला मारतो”, सततच्या होणाऱ्या चर्चांबाबत अभिनेत्रीने सोडलं मौन, म्हणाली, “मी त्याला घाबरते असं…”

या पोस्टवर नेटकऱ्यांनीही लाईक व कमेंटचा वर्षाव केला. नेटकऱ्यांनीही कमेंट करत आपलं अनिरुद्धबाबतच मत मांडलं आहे. एक नेटकरी लिहीतो, ‘इतके एपिसोड्स झाल्यावर सगळ्यांच्या वागण्याचे अंदाज येतात पण नेहमी माझे अंदाज हा अनिरुद्ध देशमुख चुकवतो, आता मला सर्वात जास्त अनिरुद्धच आवडायला आणि पटायला लागला आहे’. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं, “मला या मालिकेतील अनिरुद्ध पात्राचा तिरस्कार आहे. त्याचा अभिनय किती दमदार आहे हे यावरून कळतं”, असं लिहीत मिलिंद यांच्या भूमिकेचं कौतुक केलं आहे. पण दुसऱ्या बाजूला ही मालिका बरीच लांबवली जात असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे प्रेक्षकही ही मालिका कधी संपणार असल्याचे प्रश्न कमेंट करून विचारत आहेत.

Tags: aai kuthe kay kartemarathi actormilind gawali
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Isha Keskar And Akshar Kothari New Serial

‘माझ्या नवऱ्याची बायको'नंतर ईशा केसकरची नव्या मराठी मालिकेमध्ये दमदार एन्ट्री, प्रोमो पाहून प्रेक्षक करताहेत कौतुक

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.