Tharal Tar Mag Today Episode ‘ठरलं तर मग’ ही मालिका सुरुवातीपासून टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानावर आहे. सुरुवातीपासून मालिकेत अनेक रंजक वळण प्रेक्षकांना पाहायला मिळतात.मालिकेच्या सुरुवातीपासून विलासच्या खुनाचं रहस्य पाहायला मिळतं आहे.आणि मधूभाऊ या केस मध्ये अडकल्यामुळे अर्जुन व सायलीच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मालिकेत पाहायला मिळालं(Tharal Tar Mag Today Episode)
त्या दरम्यान प्रिया व अस्मिताची कारस्थान, पुर्ना आजींचा राग,सायली-अर्जुनचे मजेशीर वाद तसेच परिस्थितीनुसार एकमेकांना सांभाळून घेणं. पुर्ना आजींचा राग निवळावं म्हणून सायलीची सुरु असलेली धडपड हे सगळं मालिकेत पाहायला मिळतं आहे. त्याचसोबत प्रतिमाची देखील मालिकेत एन्ट्री झाली आता पुढे काय होणार ही उत्सुकता प्रेक्षकांना असतानाच विलासच्या केसची सुनावणी होणार आहे.
पाहा काय घडलं आजच्या भागात? (Tharal Tar Mag Today Episode)
आजच्या भागात केसची सुनावणी असते त्यामुळे साक्षी खूप काळजीत असते पंरतु साक्षीची ही अवस्था बघून प्रिया मनोमन खुश असते. दुसऱ्या दिवशी सर्व कोर्टात जमतात तेव्हा रविराज अर्जुनला सांगतो की महीपत व साक्षीची केस आता मी लढणार आहे हे ऐकून अर्जुनला फार आश्चर्य वाटत नाही पंरतु सायली व कुसुमला धक्का बसतो. त्यांनतर मधू भाऊ कोर्टात येतात त्यांना बघून सायलीला अश्रू अनावर होतात. अर्जुन केसला सुरुवात करतो आणि पहिली साक्षीदार म्हणून प्रियालाच बोलावतो. हे ऐकून प्रियाला धक्का बसतो.अर्जुन प्रियाला विचारतो विलासचा खून झाल्यापासून आतापर्यंत काय घडलं ते सांगा. परंतु प्रिया काही बोलायला तयार नसते. तेव्हा अर्जुनच काय काय घडलं ते सांगतो.अर्जुन प्रियाची उलट तपासणी करतो.तेव्हा प्रियाच्या म्हणण्यानुसार जर विलास समोरच मधू भाऊ पैसे चोरत होते मग आश्रमात एवढा पसारा का होता? असा मुद्दा अर्जुन काढतो तेव्हा प्रियाची बोलतीच बंद होते.ही कारवाई बघून महीपत व साक्षी टेन्शन मध्ये येतात.(tharal tar mag 25th august episode)

हे देखील वाचा : “तिचं दुसरं लग्न लावून दिलं कारण…”, आईचं लग्न झाल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “आयुष्यातील एकटेपणा..”
अर्जुन विलासच्या खुनाचं सत्य सर्वांसोमर आणले का? जर असं झालं तर मधू भाऊ निर्दोष सुटतील आणि सायली व अर्जुनच्या कॉन्ट्रॅक्टच सत्य सर्वांसमोर येऊन सायली व अर्जुन वेगळे होणार का? हे बघणं रंजक ठरणार आहे.