शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

फाल्गुनी, केतकी काकूनंतर शेखर, तन्मय व तेजसही रुपालीच्या ताब्यात, नेत्राला अजूनही कोणताच उपाय सुचेना

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 9, 2024 | 11:09 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi zee marathi serial update new twist

फाल्गुनी, केतकी काकूनंतर शेखर, तन्मय व तेजसही रुपालीच्या ताब्यात, नेत्राला अजूनही कोणताच उपाय सुचेना

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिका गेल्या काही दिवसांपासून रंजक वळणावर आली आहे. मालिकेत रुपालीला विरोचकाने संमोहित करण्याची शक्ती मिळाली असल्याचे कथानक सुरु आहे. त्यामुळे रुपालीने तिच्या संमोहित करण्याच्या शक्तीने राजाध्यक्ष कुटुंबातील सर्वांनाच संमोहित केले असल्याचे पाहायला मिळत आहे. मालिकेतील हा नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना चांगलाच आवडत असून या ट्विस्टमध्ये आणखी पुढे काय होणार? याचीही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

मालिकेत रुपालीने फाल्गुनी व केतकी काकू यांना संमोहित केल्यानंतर तिने शेखर, तन्मय व तेजस यांनाही संमोहित केल्याचे पाहायला मिळत आहे. फाल्गुनी व केतकी काकू या गायब झाल्यानंतर घरात पोलिस येतात. तेव्हा रुपाली त्यांनासुद्धा संमोहित करण्याचा प्रयत्न करते. अशातच कालच्या एका प्रोमोमध्ये रुपालीने शेखरला संमोहित करुन त्याला तिच्याविरुद्ध व कुटुंबियांच्या बाजूने राहण्यास सांगितले आहे. त्यामुळे शेखरही तिच्या म्हणण्याप्रमाणे कुटुंबियांच्या बाजूने वागत आहे. रुपालीने तन्मयलाही तिच्या शक्तीने संमोहित केले आहे.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – सर्वार्थ सिद्धी योगामुळे मेष व कर्क राशीसह ‘या’ पाच राशींचे भाग्य उजळणार, आर्थिक लाभाच्या संधी मिळतील, जाणून घ्या…

अशातच कालच्या भागात रुपाली तिच्या संमोहित करण्याच्या शक्तीने तन्मय, तेजस, केतकी काकू, फाल्गुनी, शेखर या सर्वांना वश करुन नाचायला सांगते आणि घरतील ही सगळी मंडळी ‘झिंगाट’ या गाण्यावर नाचतानाचे पाहायला मिळाले. त्यामुळे आता राजाध्यक्ष कुटुंबातील नेत्रा, अद्वैत कव इंद्राणी हे सोडून सर्वच जण रुपालीच्या संमोहित होण्याच्या शक्तीने तिच्या बाजूने वश झाले आहेत.

आणखी वाचा – अप्पी-अर्जुन एकत्र येण्यासाठी अमोलचं छत्रपती शिवाजी महाराजांना गाऱ्हाणं, हातही जोडले, एकत्र येणार का?

त्यामुळे आता नेत्रा व इंद्राणी घरातील सर्व सदस्यांना रुपालीच्या या संमोहित करण्याच्या शक्तीपासून कसं मुक्त करणार? रुपालीच्या या शक्तीला नेत्रा व इंद्राणी कशा मात देणार/ आणि रुपाली तिच्या शक्तीने घरातील सदस्यांचा देवी आईच्या लेकींविरुद्ध कसा वापर करणार? हे आगामी भागांत प्रेक्षकांना पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यामुळे सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेच्या आगामी भागांसाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक आहेत.    

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Gulabi Sadi Song Viral

Video : पाकिस्तानातील मराठी मुलाने स्वतःच्या लग्नात 'गुलाबी साडी'वर केला भन्नाट डान्स, उपस्थितही बघतच बसले अन्…; व्हिडीओ व्हायरल

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.