Alia Bhatt Express Feeling On National Award : ६९व्या राष्ट्रीय पुरस्काराची काल घोषणा झाली. साऱ्यांनाच यंदाच्या राष्ट्रीय पुरस्काराचे मानकरी कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली होती. अशातच काल २४ ऑगस्ट रोजी ६९व्या राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाली असून यांत हिंदी तसेच दाक्षिणात्य चित्रपटांसह मराठी चित्रपटांनीही आपल्या नावाचा डंका केला. यंदाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या यादीत अभिनेत्री आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी), क्रिती सेनॉन (मीमी) या अभिनेत्रींनीं नाव कोरलं. दोन्ही अभिनेत्रींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. अशातच अभिनेत्री आलिया भट्ट हिची आई सोनी राजदान यांनीही लेकीचं कौतुक केलं आहे. हा सन्मान कोणत्याही कलाकारासाठी सर्वात मोठा असल्याचं, सोनी यांनी म्हटलं.
६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ‘गंगूबाई काठियावाडी’ चित्रपटासाठी आलिया भट्ट व ‘मिमी’ चित्रपटासाठी कृती सेनन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. आलिया भट्टने सोशल मीडियावर याबाबतची पोस्ट करत म्हटलं आहे की, “मी हा पुरस्कार संजय सर (संजय लीला भन्साळी), माझे कुटुंब, माझी टीम आणि माझ्या संपूर्ण प्रेक्षकांना समर्पित करते. तुमच्याशिवाय काहीही शक्य नव्हते. हा राष्ट्रीय पुरस्कार तुमचा आहे. मी यांसारख्या क्षणांमुळे भारावून जाणार नाही. पुढे मी आणखी मेहनत करेन”.
आलियानेही तिच्या पोस्टमध्ये क्रिती सेननचेही अभिनंदन केले आहे. क्रिती सेननचं अभिनंदन करत आलिया म्हणाली की, “मी मिमी चित्रपट पाहिला. तेव्हा मला कळाले की किती दमदार कामगिरी होती. चित्रपट पाहून मी खूप रडले. तू या सन्मानास खूप पात्र आहेस”.
To Sanjay Sir..
— Alia Bhatt (@aliaa08) August 24, 2023
To the entire crew..
To my family..
To my team
& last but most definitely not the least
To my audience.. ♥️
This national award is yours .. because without you ALL none of this would be possible.. seriously!!!
I am SO grateful 🙏.. I do not take moments… pic.twitter.com/zP1aC4j2EP
पुरस्कार जिंकल्यानंतर क्रिती सेनन हिने देखील सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत सर्वांचं अभिनंदन केलं. क्रिती म्हणाली, “चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण सर म्हणाले होते की बघ, तुला ‘मिमी’साठी राष्ट्रीय पुरस्कार नक्कीच मिळेल. आणि तुमच्या म्हणण्याप्रमाणे हा पुरस्कार मिळाला सर. तुमच्याशिवाय हे कदाचित शक्य झाले नसते”.
याशिवाय क्रितीने प्रेक्षकांचे व तिच्या कुटुंबाचेही आभार मानले आहेत. क्रितीने तिच्या नोटमध्ये आलिया भट्टचाही उल्लेख केला आहे. क्रितीने म्हटलं आहे की, “आलिया तुझेही अभिनंदन. तुझ्या कामाचं मी नेहमीच कौतुक केले आहे. हा पुरस्कार तुझ्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे”.