मंगळवार, जुलै 28, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

ना हातभर मेहंदी, ना अवाढव्य खर्च; लग्नाच्या वर्षभरानंतर ‘पारू’ फेम शरयू सोनावणेच्या मेहंदी सोहळ्याची रंगली चर्चा, साधेपणाचं कौतुक

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
मे 8, 2024 | 12:55 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Sharayu Sonavane Mehandi Ceremony

ना हातभर मेहंदी, ना अवाढव्य खर्च; लग्नाच्या वर्षभरानंतर 'पारू' फेम शरयू सोनावणेच्या मेहंदी सोहळ्याची रंगली चर्चा, साधेपणाचं कौतुक

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करताना दिसत आहेत. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलेलं पाहायला मिळतं. मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना अक्षरशः खुर्चीत खिळवून ठेवलं आहे. तसेच मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका अधिकच लोकप्रिय झाली. या मालिकेतून अभिनेत्री शरयू सोनावणे ही पारूच्या भूमिकेतून समोर आली आहे. मालिकेतील शरयूच्या भूमिकेला म्हणजेच पारूला विशेष पसंती मिळत आहे. शरयूने आजवर तिच्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. (Sharayu Sonavane Mehandi Ceremony)

पारू या मालिकेशिवाय शरयू तिच्या वैयक्तिक कारणामुळे चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वीच शरयूने तिच्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. शरयूने तिच्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त तिच्या लग्नातील काही खास क्षण चाहत्यांसह शेअर केले. वर्षभरापूर्वीच शरयूने निर्माता जयंत लाडेसह लग्नगाठ बांधली. वर्षभर दोघांनी त्यांच्या या लग्नाबाबत गुपित ठेवलं होतं. लग्नाला वर्ष होताच त्यांनी लग्नाची जाहीर बातमी चाहत्यांसह शेअर केली.

आणखी वाचा – क्रांती रेडकरच्या मुलींनी वडिलांच्या पायावर डोकं ठेवत केला नमस्कार, मुलींच्या संस्कारांचं होतंय कौतुक, व्हिडीओ व्हायरल

View this post on Instagram

A post shared by SharayuSonawane (@sharayusonawaneofficial)

सोशल मीडियावरुन शेअर केलेल्या या फोटोंमध्ये त्यांच्या लग्नाचे अनेक फोटो चर्चेत राहिले. यानंतर आता शरयूने तिच्या मेहंदी सोहळ्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत. मेहंदी समारंभासाठी शरयूने पांढऱ्या व निळ्या रंगाची वेस्टर्न टच असलेली अशी लेहेंगा चोळी परिधान केली होती. तसेच तिच्या हातावर सुबक व कोरीव अशी नक्षीकाम करत काढलेली मेहंदी अधिक लक्षवेधी ठरत आहे. भरीव अशी मेहंदी न काढता शरयूने तिच्या हातावर नाजूक आणि मोजक्याच नक्षीत मेहंदी काढली होती. मेहंदीच्या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

आणखी वाचा – “खूप वाईट वाटतंय आणि…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून गौरव मोरेची कायमची एक्झिट, शो सोडल्यानंतर म्हणाला, “माफी मागतो कारण…”

शरयूच्या लग्नातील तिच्या लूकची बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली. यावेळी शरयूने लग्नासाठी खास लाल रंगाची सुंदर नक्षीकाम असलेल्या काठाची भरजरी पैठणी नेसली होती आणि त्यावर हिरव्या रंगाचा नक्षीकाम असलेला शेलाही घेतला होता. तिचा हा मराठमोळा लूक चर्चेत आला. तर रिसेप्शनसाठी शरयूने पांढऱ्या रंगाची डिझाइनर साडी नेसली होती. आणि त्यावरील आकर्षक असे डायमंडचे दागिने लक्षवेधी ठरले.

Tags: marathi actresspaaru fame actess sharayu sonavanepaaru marathi serialsharayu sonavaneSharayu Sonavane Mehandi Ceremony
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

 Badshah Isha Rikhi Marriage in Trouble
Entertainment

“मी गप्प राहिले कारण मला भीती वाटत होती”, सुप्रसिद्ध गायकाच्या पत्नीची धक्कादायक पोस्ट, चार महिन्यांपूर्वीच झालेलं लग्न…

जुलै 28, 2026 | 10:24 am
stories of Abhay Verma
Entertainment

मुलांनी घेरलं, घाणेरडं कृत्य केलं आणि…; भूमिकेची तयारी करताना सुप्रसिद्ध अभिनेत्याला समजलं होतं ट्रान्सजेंडर, म्हणालेला…

जुलै 27, 2026 | 11:10 am
Jasmin Bhasin Health Update
Entertainment

“मला गंभीर आजार आहे”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीवर दुबईच्या रुग्णालयात सुरु होते उपचार, खूप वेदना आणि…

जुलै 27, 2026 | 9:55 am
Pach Futacha Bachchan Marathi Movie
Entertainment

‘पाच फुटाचा बच्चन’ चा दैदीप्यमान प्रवास : कीर्तन, संस्कृती आणि संघर्षाची प्रेरणादायी कथा

जुलै 25, 2026 | 2:00 pm
Next Post
Riteish Deshmukh said that in Deshmukh's family everyone speaks respectfully to each other.

देशमुखांच्या घरात कुणीही एकमेकांना करत नाही अरे-तुरे, रितेश देशमुख मुलांनाही देतो आदर म्हणाला, “माझ्या वडिलांनीच...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.