शनिवार, जुलै 25, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिचं दुसरं लग्न लावून दिलं कारण…”, आईचं लग्न झाल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, “आयुष्यातील एकटेपणा..”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑगस्ट 24, 2023 | 2:29 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Siddharth Chandekar On Seema Chandekar

"तिचं दुसरं लग्न लावून दिलं कारण...", आईचं लग्न झाल्यानंतर सिद्धार्थ चांदेकरची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "आयुष्यातील एकटेपणा.."

कलाकारांच्या खऱ्या आयुष्यात नेमकं काय चाललंय, हे जाणून घ्यायला प्रेक्षकांना फार आवडत. बरेचदा ही कलाकार मंडळी आपल्या खासगी आयुष्यात काय चाललंय, हे सांगायला तयार नसतात. बऱ्याच गोष्टी ते लपूनछपून करतात, मात्र बरीच कलाकार मंडळी अशी आहेत जी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खुलेपणाने सोशल मीडियावर भाष्य करतात. अशातच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर व त्याची पत्नी अभिनेत्री मिताली मयेकर यांनी देखील त्यांच्या खासगी आयुष्यातील आनंदाचे क्षण सोशल मीडियावरून शेअर केले आहेत. (Siddharth Chandekar On Seema Chandekar)

सिद्धार्थ चांदेकर त्याच्या आयुष्यातील सकारात्मक प्रसंगामुळे चर्चेत आला आहे. आणि त्याच्या या कृतीच सर्वत्र कौतुकही केलं जातं आहे. सिद्धार्थने त्याची आई सीमा चांदेकर यांचं दुसरं लग्न लावून दिलं आहे. सोशल मीडियावर त्याने त्याची आई आणि ज्येष्ठ अभिनेत्री सीमा चांदेकर यांच्या दुसऱ्या लग्नाची पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्याने सीमा चांदेकर यांना दुसऱ्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

View this post on Instagram

A post shared by Siddharth Seema Chandekar (@sidchandekar)

त्यानंतर आता सिद्धार्थ चांदेकर ‘महाराष्ट्र टाइम्स’सह बोलताना आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोलला, यावेळी सिद्धार्थ म्हणाला, “आईनं तिचं आयुष्य आम्हा दोघा भावंडांसाठी खर्ची केलं. पण आता आमचं सर्व मार्गी लागल्यावर तिच्या आयुष्यात एकटेपणा अधिक भासू लागला. तेव्हा तिला एका जोडीदाराची गरज आहे असं आम्हाला जाणवलं. मी आणि माझ्या बहिणीनं तिला कितीही वेळ दिला तरी तो कमीच पडणारा आहे. अशावेळी आम्ही आईची समजूत घातली आणि तिला समजून घेत या निर्णयासाठी तयार केलं”.

आणखी वाचा – चित्रपटसृष्टीमध्ये आल्यानंतर सीमा देव यांनी बदललं होतं स्वतःचं नाव, पण त्यांचं खरं नाव नेमकं काय?

यापुढे बोलताना तो म्हणाला, “आमचं संपूर्ण कुटुंब, मुलं तिच्या पाठीशी असलो तरी आम्ही प्रत्येक क्षणी तिच्याबरोबर नसू, त्यासाठी जोडीदारच हवा. जो प्रत्येक क्षणी तिला साथ देईल. हा विचार करून आम्ही आईचं दुसरं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांतच नितीन काकांचं स्थळ सांगून आलं”.

आणखी वाचा – ५२वर्षे अभिनेत्री सीमा देव यांनी एकच हिऱ्याचे कानातले वापरले कारण…; स्वतः केला होता खुलासा, म्हणालेल्या, “माझ्यासाठी…”

सिद्धार्थच्या या कृतीच सर्वच स्तरातून कौतुक होतं असून अनेक कलाकार मंडळी व प्रेक्षक त्यांच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Tags: mitali mayekarseema chandekat weddingsiddharth chandekarSiddharth Seema Chandekar
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shekhar Suman On Student Protest
Entertainment

तीन दिवस झोप नाही, रडत आहे आणि…; आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जमुळे प्रसिद्ध अभिनेत्याला दुःख, म्हणाला…

जुलै 25, 2026 | 12:45 pm
Eva grover husband hyder ali khan
Entertainment

दिग्दर्शकासह शरीरसंबंध ठेवण्यास जबरदस्ती आणि…; नवऱ्याबाबत सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, म्हणाली, “पैशांसाठी…”

जुलै 25, 2026 | 11:00 am
Akanksha Chamola Gaurav Khanna Lock Upp 2
Entertainment

Lock Upp 2 : गौरव खन्नाची कुत्र्याशी तुलना करणं पत्नीला पडलं भारी, नेटकरी भडकले, म्हणाले, “घटस्फोट दे…”

जुलै 25, 2026 | 9:50 am
Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Next Post
Ashok Saraf on Seema Deo Death

"माझ्या मोठ्या बहिणीसारखं मी त्यांना…", सीमा देव यांच्या निधनानंतर अशोक सराफ यांना दुःख अनावर, म्हणाले, "कित्येक काळ…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.